भविष्यात कृत्रिम गर्भात विकसित होणार भ्रूण, चिनी शास्त्रज्ञांचा दावा

जर्नल ऑफ बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये याविषयी अभ्यास प्रकाशित झाला आहे.
The embryo will develop outside the womb
The embryo will develop outside the womb google
Updated on

गर्भवती महिलांना पोटात गर्भ असताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. तसेच ९ महिने संपूर्ण घर त्यांना जपत असतं. मुल पोटात (Pregnancy) कसं वाढतंय हे बघायला डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घेतला जातो. त्यानंतर मग नऊ महिल्यांनी बाळाचा जन्म होतो. काही बायकांना हे सुख मिळतं. तर काहींना त्रास होतो. पण आता बाळाच्या जन्माबाबत एक नवा अभ्यास (Study) समोर आला आहे. त्यानुसार येत्या काही वर्षात गर्भाबाहेर भ्रूण विकसित होईल, असा दावा चिनी (China) शास्त्रज्ञांनी केला आहे.

The embryo will develop outside the womb
कोरोनामुळे गर्भपात होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) असलेली बेबीसिटर त्याची काळजी घेण्यासाठी असेल असेही त्यांनी सांगितले आहे. कृत्रिम भ्रुणाच्या विकासासंबंधी प्रत्येक गोष्टीवर एसआयच्या सक्षम रोबोटकडून लक्ष ठेवले जाईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हा अभ्यास जर्नल ऑफ बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रकाशित झाला आहे. चीनच्या (China) शुझोउ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञ उंदरांवर कृत्रिम भ्रूण विकसित करत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

The embryo will develop outside the womb
वेगाने चालणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका 34 टक्क्यांनी कमी
Pregnant Women
Pregnant Womenesakal

एवढेच वाही तर, एआयद्वारे चालणारी रोबोट नर्स या भ्रुणावर लक्ष ठेवत असून त्यांच्या विकासावर लक्ष ठेवते आहे. भविष्यात या तंत्राचा वापर महिलांवर केला जाऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. यामुळे महिलांना गर्भधारणेदरम्यान निर्माण होणाऱ्या समस्यांपासून आराम मिळेल. ती कृत्रिम गर्भात बाळाची वाढ पाहू शकेल. हे तंत्रज्ञान आपल्याला जीवनाचा विकास समजून घेण्यास मदत करेल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. याद्वारे भविष्यात आपण मानवी भ्रुणाचा होणारा विकास बारकाईने समजून घेऊ शकतो. तसेच जन्माशी संबंधित समस्यांवर मात करू शकतो, असा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे.

The embryo will develop outside the womb
धुम्रपान तुम्ही करताय! परिणाम नातवंड भोगतील, रिसर्चमधून नवी माहिती उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()