चीनने वाढवलं जगाचं टेन्शन; लपवली अणू प्रकल्पातील गळतीची घटना

चीनने वाढवलं जगाचं टेन्शन; लपवली अणू प्रकल्पातील गळतीची घटना
ANI
Updated on
Summary

चीनमध्ये एका अणू प्रकल्पात गळती झाल्याची घटना घडली आहे. यामुळे जगाचं टेन्शन वाढलं असून हा प्रकार आठवड्यापूर्वी घडला आहे.

बिजिंग - गेल्या दीड दोन वर्षांपासून जगभर थैमान घातलेल्या कोरोनाची सुरुवात चीनमधून झाली होती. यासाठी चीनवर अनेक देशांनी आरोप केले आहेत. चीनने कोरोनाबाबतची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर आता आणखी एक घटना चीनने लपवून ठेवल्याचं उघडकीस आलं आहे. चीनमध्ये एका अणू प्रकल्पात गळती झाल्याची घटना घडली आहे. यामुळे जगाचं टेन्शन वाढलं असून हा प्रकार आठवड्यापूर्वी घडला आहे. या प्रकाराची चौकशी आता ईडीएफने सुरु केली आहे. चीनच्या अणू प्रकल्पामध्ये फ्रान्समधील पॉवर ग्रुप ऑफ ईडीएफची 30 टक्के भागिदारी आहे. गळतीची घटना समोर आली असली तरीही त्याची तीव्रता किती आहे याबाबत समजू शकलेलं नाही.

गेल्या एक आठवड्यापासून अमेरिकेच्या सरकारकडून अणू प्रकल्पात होत असलेल्या किरणोत्सारी पदार्थाच्या गळतीच्या अहवालाची समीक्षा सुरु आहे. फ्रान्सची कंपनी असलेल्या ईडीएफने अमेरिकेकडे यासदंर्भात मदत मागितली होती. तसंच अणू प्रकल्पातून होत असलेल्या गळतीमुळे धोका असल्याचा इशाराही ईडीएफने दिला आहे. चीनकडून तैशान अणुऊर्जा प्रकल्पात किरणोत्सर्गाची मर्यादा ओलांडली जात आहे. यामुळेच अणू प्रकल्पातून गळती झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याचे वृत्त सीएनएनने दिलं आहे.

चीनने वाढवलं जगाचं टेन्शन; लपवली अणू प्रकल्पातील गळतीची घटना
फायझर, अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस डेल्टा व्हेरिएन्टवर प्रभावी

अणुऊर्जा केंद्राचा आराखडा ईडीएफने तयार केला आहे. इतकंच नाही तर अणू प्रकल्प चालवण्यासाठीही चीन या कंपनीची मदत घेत आहे. याच कंपनीकडून किरणोत्सारी पदार्थ प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचं आणि ही बाब धोकादायक असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं आहे. तैशान अणू प्रकल्पात असलेल्या एक नंबरच्या प्लांटमध्ये हा प्रकार घडला आहे. एका सर्किटमधून क्रिप्टन आणि झेनॉन गॅसची गळती झाली. हे निष्क्रिय वायू असले तर त्यात किरणोत्सारी पदार्थ आहेत. ही गळती वाढत राहिली तर त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो असंही ईडीएफकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, चीनने मात्र किरणोत्सारी पदार्थांची गळती ही नॉर्मल असल्याचं म्हणत आरोप फेटाळून लावले आहेत.

ईजीएफने याबाबत माहिती दिली असली तरी अद्याप अमेरिकेने यावर विश्वास ठेवलेला नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांकडून या गळतीचा चीनच्या नागरिकांना किंवा पर्यावरणाला काही धोका नसल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेकडे मदत मागितल्याचं ईडीएफने सांगितलं आहे. मात्र चीनसुद्धा ही गळती मोठी आणि गंभीर असल्याचं मान्य करत नाही. त्यामुळे यातून काही अनर्थ घडला तर याचं खापर अमेरिकेवर फोडलं जाऊ शकतं असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

चीनने वाढवलं जगाचं टेन्शन; लपवली अणू प्रकल्पातील गळतीची घटना
WHOच्या मान्यतेनंतरही चीनच्या लसीकडे देशांची पाठ

दरम्यान, चीनमधील या गळतीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं काही बैठका घेतल्याचं समजते. उच्च स्तरीय बैठकांमध्ये यावर चर्चा झाली असून फ्रान्स सरकार, कंपनी आणि चीन यांच्याशी संबंधित घटनेबाबत बोलल्याचं म्हटलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()