China-Taiwan: तैवानला चारही बाजूने घेरुन चीनचे युद्धअभ्यासाचे 'नाटक'; जागतिक पटलावर मोठ्या घडामोडीचे संकेत

China testing ability : गेल्या काही दिवसात तैवानमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी यामुळे चीन संतापला आहे. याच दृष्टीकोनातून हा युद्धअभ्यास सुरु केला जात आहे.
China military drills
China military drillsesakal
Updated on

China-Taiwan: चीनने शुक्रवारी तैवानच्या आजूबाजूला युद्धअभ्यास सुरु केला आहे. चीनचा तैवानवर डोळा असून त्याला अनेक भाग गिळंकृत करायचे आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसात तैवानमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी यामुळे चीन संतापला आहे. याच दृष्टीकोनातून हा युद्धअभ्यास सुरु केला जात आहे. चीनने तैवानला चारही बाजूने घेरलंय. त्यामुळे एकप्रकारे चीन तैवानला आणि जगाला इशारा देऊ पाहात आहे.

चीनने गुरुवारपासून हा युद्धअभ्यास सुरु केला आहे. तैवानच्या नव्या अध्यक्षांनी पदाची शपथ घेतली आहे. या कृतीला विरोध म्हणून चीन ही दादागिरी दाखवत आहे. या युद्धअभ्यासामध्ये एअर फोर्स, रॉकेट फोर्स, नेव्ही, आर्मी आणि कोस्टगार्ड यांचा समावेश आहे. चीनने तैवानच्या पाच स्थळांना लक्ष्य केलं आहे. हे सर्व स्थळं चीनच्या मुख्य भूमीपासून जवळच आहेत.

China military drills
China Import: चीनमधून लॅपटॉप, टॅबलेटची आयात 47 टक्क्यांनी वाढली; मार्चमध्ये 273.6 दशलक्ष डॉलर किमतीची उत्पादने केली ऑर्डर

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, महत्त्वाचे भाग मिळवण्यासाठी आम्ही आमची शक्ती आजमावून पाहत आहोत. आमचं अंतिम ध्येय तैवानचा ताबा घेण्याची आहे. तैवानच्या जनतेचे सध्या चीन विरोधी अध्यक्षांना पदावर बसवलं आहे. याचाच राग चीनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीला २०२७ पर्यंत तैवानला सामावून घेण्याची तयारी करा असे आदेश दिले आहेत.

China military drills
China-India Trade: हिंदी-चीनी भाई भाई! बहिष्कारानंतरही चीनमधून आयात वाढली, 100 अब्ज डॉलर्सची उलाढाल

तैवानचे नवे अध्यक्ष ताई चिंग-ते यांनी उघडपणे चीन सरकारवर टीका केल आहे. आमच्या देशाची अखंडता आणि स्वतंत्रतेच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं ते म्हणाले आहेत. माहितीनुसार, तैवानने सुद्धा वायुसेना, नौसेना आणि लष्कराला अलर्टमोड वर ठेवलं आहे. तैवान आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी करत आहेत.

चीनची ही दादागिरी थेट अमेरिकेला आव्हान असल्याचं म्हटलं जातं. अमेरिकेने वारंवार तैवानच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. भविष्यात अमेरिकेने खरंच तैवानवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला, तर अमेरिका बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. अशावेळी जागतिक राजकारणात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.