नवी दिल्लीः सध्या चीनमध्ये कोरोनाने हाहाःकार माजला. रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत तर ऑक्सिजनचाही तुटवडा झाल्याचं मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहे. त्यातच आता चीनने प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम रद्द केला आहे. विशेष म्हणजे आज राष्ट्रपती जिनपिंग यांनी कोरोनाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
आज पहिल्यांदाच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना आवाहन करत सांगितलं की, लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा. आरोग्य मिशन राबवणं आता गरजेचं आहे. महामारीसोबत लढण्यासाठी दमदार पावलं उचलावी लागतील.
हेही वाचाः जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी राबवल्यानंतरच कोरोनाने डोके वर काढले होते. सध्या रुग्णालयांमध्ये बेड नाहीत आणि ऑक्सिजनचाही तुटवडा आहे.त्यामुळे हजारो लोक मृत झाल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ठिकठिकाणी लांबच लांब रांग लागल्याचे व्हिडिओ समोर येत आहे. वाढत्या मृत्यूच्या संख्येमुळे अंत्यसंस्कारासाठीदेखील नातेवाईकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
हे कमीय की काय आता चीनने बाहेरुन आलेल्या देशांतर्गत प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय रद्द केला आहे. येत्या ८ जानेवारीपासून हा नियम आमलात येईल. तीन वर्षांपूर्वीच्या या नियमाला आता शिथीलता देण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी ही माहिती दिली. चीनच्या या अजब निर्णयाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.