Coronavirus : कोरोनाबाबत चीननं खेळली आणखी एक खेळी; आता म्हणतंय, 'कोविडची माहितीच देणार नाही'

चीनमध्ये कोरोनानं जीवघेणं रूप धारण केलंय.
China Wuhan Coronavirus
China Wuhan Coronavirusesakal
Updated on
Summary

चीनमध्ये कोरोनानं जीवघेणं रूप धारण केलंय.

बीजिंग : चीनमध्ये कोरोना व्हायरसची (Coronavirus In China) प्रकरणं सातत्यानं वाढत आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लाखो लोकांना संसर्ग झाल्यामुळं शेजारच्या देशात ना रुग्णालयात बेड रिकामे आहेत, ना तिथं औषधं उपलब्ध आहेत.

कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळं चीन आपली आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं आता आज रविवारपासून कोरोना डेटा जारी करणार नसल्याचं सांगितलंय.

China Wuhan Coronavirus
Tunisha Sharma : तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणारा शीजान खान आहे तरी कोण?

चीनच्या NHC नं (National Health Commission) एका निवेदनात म्हटलंय की, चीनी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (Chinese Center for Disease Control and Prevention) संबंधित कोविड-19 माहिती आणि संशोधनासाठी कोरोना डेटा प्रसिध्द केला जाणार नाही, असं स्पष्ट केलंय.

China Wuhan Coronavirus
Bomb Cyclone : बॉम्ब चक्रीवादळात अमेरिका गारठलं; तुफान वादळात 18 जणांचा मृत्यू, 5 हजारहून अधिक उड्डाणं रद्द

चीनमध्ये कोरोनानं जीवघेणं रूप धारण केलंय. कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 100 दशलक्ष ओलांडली असून सुमारे 10 लाख लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. चीनमध्ये परिस्थिती इतकी बिकट झालीये की, रुग्णालयात उपचाराअभावी 5 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.