Viral Video : फक्त 3 सेकंदांचा इन्स्टाग्राम व्हिडीओ अन् कमावले 120 कोटी; रील बघून तुम्हीही व्हाल आवाक्

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत एक महिला कपड्याच्या उत्पादनांची समीक्षा करत आहे. ती एका प्रोडक्टवर तीन सेकंदसुद्धा थांबत नाही तरीही तिचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अशा व्हिडीओतून ती आठवड्याला १२० कोटी रुपये कमावते.
Viral Video : फक्त 3 सेकंदांचा इन्स्टाग्राम व्हिडीओ अन् कमावले 120 कोटी; रील बघून तुम्हीही व्हाल आवाक्
Updated on

China Online Product Market : इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत एक महिला कपड्याच्या उत्पादनांची समीक्षा करत आहे. ती एका प्रोडक्टवर तीन सेकंदसुद्धा थांबत नाही. तरीही तिचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अशा व्हिडीओंमधून ती आठवड्याताला १२० कोटी रुपये कमावत असल्याची माहिती आहे.

तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. शिवाय कमाईची माध्यमंही व्यापक झालीत. लाखो लोक यु ट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या मदतीने पैसे मिळवत आहेत. चीनच्या एका महिलेने शॉर्ट व्हिडीओ बनवून तब्बल १२० कोटी रुपये कमावले आहेत. या महिलेचं नाव झेंग जियांग असं आहे.

चिनी उत्पादनांच्या ऑनलाईन जाहिरातींच्या क्षेत्रात झेंग जियांगने क्रांती घडवून आणली आहे. तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे तिचे फॉलोअर्सदेखील वाढलेत. चिनी टिकटॉकवर तिचे ५० लाखांवर अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिच्या अकाऊंटवरुन उत्पादनांची जाहीरात करते, तेही काही सेकंदात ती त्या उत्पादनाची समीक्षा करते.

एखादं उत्पादन ती फक्त तीन सेकंद दाखवते आणि त्याबद्दल तीन सेकंदातच सांगते. हेच तिच्या यशस्वीतेचं खरं राज असल्याचं जाणकारांचं मत आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत दिसतंय की, जियांग कपड्यांच्या उत्पादनांची ऑनलाईन समीक्षा करत आहे. त्यात ती एका प्रोडक्टवर तीन सेकंदापेक्षा कमी वेळ थांबते. व्हिडीओमध्ये दिसतंय- तिला एकएक प्रोडक्ट दिलं जात आहे. ती ते प्रोडक्ट कॅमेऱ्यासमोर दाखवते आणि त्याबद्दल काहीतरी बोलते.

लाईव्ह स्टीमिंगमध्ये झेंग जियांगचे सहकारी तिला एकेक वेगवेगळ्या वस्तूंनी भरलेला नारंगी बॉक्स देते. काहीच सेकंदात ती प्रत्येक प्रोडक्ट उचलते आणि कॅमेऱ्यासमोर त्याचं संक्षिप्त विवरण देते. त्यानंतर ती ते प्रोडक्ट बाजूला टाकते. जियांगच्या या गुणवत्तेमुळे प्रत्येक आठवड्यात तिची १२० कोटी रुपयांची कमाई होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.