चीनने तयार केला कृत्रिम सूर्य, खऱ्या सूर्यापेक्षा पाचपट उष्ण

चीनने तयार केला कृत्रिम सूर्य, खऱ्या सूर्यापेक्षा पाचपट उष्ण
Updated on

चीनने नुकत्याच केलेल्या कन्टीन्युअस हाय टेपरेचर प्लाझ्मा ऑपरेशन प्रयोगात(In continuous high temperature plasma operation experiment) कृत्रिम सुर्य EAST यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. जगातील या प्रकारातील सर्वात जास्त काळ चालेला हा प्रयोग आहे. चीनच्या एक्सपरिमेंटल सुपरकंडक्टिंग टोकामाक ( Experimental Advanced Superconducting Tokamak -EAST) ने गेल्या आठवड्यात 70 दशलक्ष सेल्सिअस प्लाझ्मा तापमानात 1,056 सेकंद कार्यरत राहून नवीन विक्रम नोंदविला आहे. रिपोर्टनुसार खऱ्या सुर्यापेक्षा (Real Sun) हा कृत्रिम सुर्य (Artificial Sun)पाच पट जास्त उष्ण(hotter)असल्याचा दावा केला आहे.

क्लिन एनर्जी निर्माण करण्यासाठी समुद्रातील ड्युटेरिअमच्या (deuterium ) मदतीने सूर्यामध्ये घडणाऱ्या न्यूक्लियर फ्यूजन रिअॅक्शन (nuclear fusion reaction) निर्माण करण्याचे ईस्टचे उद्दिष्ट आहे.

चीनने तयार केला कृत्रिम सूर्य, खऱ्या सूर्यापेक्षा पाचपट उष्ण
शाओमीचा सर्वात फास्ट चार्जिंग स्मार्टफोन भारतात लॉन्च; वाचा डिटेल्स

गेल्या आठवड्यात गुरुवारी, कृत्रिम सूर्य म्हणून तयार केलेल्या EASTने नवीनतम प्रयोगात कंटीन्यूअस हाय टेंपरेचर प्लाझ्मा ऑपरेशन यशस्वी केले, जो जगातील अशा प्रकाराच्या ऑपरेशनमध्ये सर्वात जास्त काळ चालेला हा प्रयोग होता. पूर्व चीनच्या अनहुई प्रांताची राजधानी हेफेई येथे हा प्रयोग करण्यात आला. डोनटच्या आकाराच्या एक्सपिरेमेंट मशीनद्वारे हा प्रयोग करण्यात आला. एक्सपिरेमेंट मशीनमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF)वेव्ह सिस्टम, लेझर स्कॅटरिंग सिस्टम, व्हॅक्यूम सिस्टम आणि मायक्रोवेव्ह सिस्टम समाविष्ट आहे.

चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (एएसआयपीपी) च्या इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा फिजिक्सचे संशोधक आणि प्रयोगाचे निरीक्षण करणारे गोंग झियानझू यांनी शुक्रवारी ही बातमी जाहीर केली.

शिन्हुआने गोंगचा हवाला देऊन एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही 2021 च्या पहिल्या सहामाहीत एका प्रयोगात 101 सेकंदांसाठी 120 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान गाठले. यावेळी, 70 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमानात स्थिर-स्थितीतील प्लाझ्मा ऑपरेशन 1,056 सेकंदांपर्यंत टिकून होते, ज्यामुळे फ्यूजन अणुभट्टी (fusion reactor)चालवण्याच्या दिशेने एक भक्कम वैज्ञानिक आणि प्रायोगिक पाया घातला आहे.”

चीनने तयार केला कृत्रिम सूर्य, खऱ्या सूर्यापेक्षा पाचपट उष्ण
बूस्टरचे दोन डोस, २०२२ अखेर पर्यंत आणखी एक - मॉडर्ना सीईओ

पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि बरेच काही अशा जीवाश्म इंधनांसारख्या पारंपारिक इंधनांना (cleaner alternative)चांगला पर्याय म्हणून फ्यूजन एनर्जीचा विकास केला जात आहे. जीवाश्म इंधन हे ऊर्जा क्षेत्राचा मोठा भाग निर्माण करत असून ते वाढत्या ग्लोबल वार्मिंग आणि हवामान संकटासाठी देखील मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. जगाला हवामान संकटाच्या भयंकर परिणामांपासून दूर ठेवताना जगाच्या सतत वाढणाऱ्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या क्लिन इंधनाकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

न्यूक्लियर फ्यूजन रिअॅक्शनमध्ये ड्युटेरियमचा वापर होतो, जो हायड्रोजनच्या दोन स्थिर समस्थानिकांपैकी एक आहे. जीवाश्म इंधनाचा साठा मर्यादित आहे पण त्याला उलट ड्युटेरियम समुद्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. समस्थानिकाचा वापर EAST सारख्या प्रोटोटाइप फ्यूजन अणुभट्ट्यांमध्ये((fusion reactor) केला जातो, कारण तो क्लिन एनर्जीचा (cleaner energy) एक स्थिर प्रवाह तयरा करतो ज्यामुळे रिअॅक्शन शक्तीशाली होते. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की न्यूक्लियर फ्यूजन रिअॅक्शन मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण न करता उच्च पातळीची ऊर्जा निर्माण करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()