India-Canada: भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना झटका, ट्रुडोंना हादरवणाऱ्या अहवालात काय?

Justin Trudeau: या दोन्ही निवडणुकांमध्ये जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षाचा विजय झाला होता हे विशेष. या दस्तऐवजात अनेक राजकीय पक्षांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
India Canada Dispute justin trudeau repeat allegations on india over hardeep singh nijjar killing
India Canada Dispute justin trudeau repeat allegations on india over hardeep singh nijjar killing Sakal
Updated on

China's Interference In Canada's 2 elections:

चीनने निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. कॅनडाची गुप्तचर संस्था कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (CSIS) ने म्हटले आहे की, कॅनडाच्या दोन निवडणुकांमध्ये चीनने गुप्तपणे हस्तक्षेप केला.

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी स्थापन केलेल्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 2019 आणि 2021 मध्ये झालेल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चीनने छुप्या पद्धतीने हस्तक्षेप केला होता.

देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये परदेशी हस्तक्षेप होत असल्याचे आरोप सतत होत होते. त्यानंतर विरोधी पक्षाच्या दबावानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी परदेशी हस्तक्षेपाबाबत चौकशी आयोग स्थापन केला.

या अहवालानंतर यातील चीनच्या भूमिकेवर ट्रुडो नाराज आहेत. 2021 मध्ये जस्टिन ट्रूडो यांनी जिंकलेल्या निवडणुकीत भारताने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. पण निवडणुकांवर लक्ष ठेवणाऱ्या कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या पॅनलने असे आरोप फेटाळून लावले होते.

मात्र आता 2019 आणि 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत भारताने नव्हे तर चीनने हस्तक्षेप केल्याचे समोर आले आहे.

या दोन्ही निवडणुकांमध्ये जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षाचा विजय झाला होता हे विशेष. या दस्तऐवजात अनेक राजकीय पक्षांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि किमान 11 उमेदवार आणि 13 कर्मचारी हे चीनी सरकारच्या विदेशी हस्तक्षेपात अडकले आहेत.

दरम्यान, तपासापूर्वी सादर करण्यात आलेल्या आणखी एका CSIS दस्तऐवजात सात लिबरल उमेदवार आणि चार कंझर्व्हेटिव्ह पार्टी ऑफ कॅनडाच्या उमेदवारांचा उल्लेख आहे.

India Canada Dispute justin trudeau repeat allegations on india over hardeep singh nijjar killing
Hepatitis : 'हेपटायटीस'च्या संसर्गामुळे दररोज 3,500 लोकांचा मृत्यू, सर्वात धोकादायक 10 देशांमध्ये भारताचा समावेश; WHO चा इशारा

गेल्या फेब्रुवारीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्लोबल न्यूजच्या अहवालात असे म्हटले होते की, "कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस (CSIS) च्या अवर्गीकृत टॉप-सिक्रेट ब्रीफिंग अहवालात चीनसह भारताला कॅनडाच्या लोकशाही प्रक्रियेसाठी 'संभाव्य धोका' असल्याचे समोर आले आहे. फेडरल कमिशनने दोन मतपत्रिकांवर प्रभाव टाकण्यात भारताने कोणती भूमिका बजावली याची चौकशी करण्याचा आपला इरादा दर्शविला आहे."

2021 च्या प्रचारादरम्यान कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या एरिन ओ'टूले यांनी आरोप केला की, चिनी हस्तक्षेपामुळे त्यांच्या पक्षाला नऊ जागांवर फटका बसला. परंतु त्यामुळे निवडणुकीचा निकाल बदलला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.