Jack Ma : चिनी अब्जाधीश जॅक मा अनेक दिवसानंतर दिसले एका रेस्टॉरंटमध्ये; बँकॉकमधील...

Jack Ma
Jack Ma
Updated on

नवी दिल्ली - चीनचे अब्जाधीश आणि अली बाबा समूहाचे संस्थापक जॅक मा हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. ते थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बऱ्याच काळानंतर दिसले. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले जॅक मा या आठवड्यात बँकॉकमधील एका बॉक्सिंग सामन्यात आणि एका रेस्टॉरंटमध्ये सार्वजनिक ठिकाणी दिसले. (chinese billionaire jack ma news in Marathi)

Jack Ma
Gautam Adani : राहुल गांधींची धोरणे विकासविरोधी नाहीत; अदानींचं मोठं विधान

रॉयटर्सने स्थानिक मीडिया आणि सोशल मीडिया पोस्टचा हवाला देत ही माहिती दिली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, चीन सोडल्यानंतर जॅक मा जपानची राजधानी टोकियोमध्ये आपल्या कुटुंबासोबत आणि एका खासगी शेफसोबत राहत आहेत. दरम्यान, जॅक मा यांनी चीनची सर्वात मोठी फिन्टेक कंपनी असलेल्या अँट ग्रुपची कमान सोडली आहे. तसेच जॅक मा बेपत्ता झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

Jack Ma
St Employee : 2018 च्या संपातील दोषी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

जॅक मा यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये शांघायमधील चीनच्या वित्तीय नियामक आणि सरकारी बँकांवर जोरदार टीका केली होती. जॅक मा यांचा हल्ला हा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावरील हल्ला मानला जात होता. यामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही त्यांचा वाद झाला होता. 2021 मध्ये, चिनी नियामकांनी मोठ्या प्रमाणात त्याच्या व्यावसायिक साम्राज्यावरील निर्बंध आणले होते. इतकंच नाही तर चीन सरकारने त्यांच्या अँट ग्रुपचा मेगा आयपीओ बंद केला होता. तेव्हापासून जॅक मा अलिप्त झाले होते.

Jack Ma
Yogesh Kadam Accident : अपघातप्रकरणी रामदास कदम यांना घातपाताचा संशय; अनिल परबांचं नाव घेऊन म्हणाले...

मिशेलिन स्टार शेफ सुपिनियाने जॅक मा यांच्यासोबतचा फोटो शुक्रवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. सुपिनियाने अब्जाधीशांसोबतचा आपला एक फोटो शेअर करताना लिहिले की, "आम्हाला तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे स्वागत करण्याचा अभिमान आहे. थायलंडच्या सर्वात मोठ्या कृषी व्यवसाय समूहाच्या चारॉन पोकफंड ग्रुप बोर्डाचे अध्यक्ष सुपकित चेरावांतोंट यांच्यासह जॅक मा रेस्टॉरंटमध्ये दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.