ग्वादार(Baluchistan)- पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी चिनी अभियंत्यांच्या एका चमुवर हल्ला करण्यात आला आहे. शस्त्रसज्य दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात आलंय.पोलिस कारवाईत दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय. सकाळी जवळपास साडे नऊ वाजता हा हल्ला झाला. त्यानंतर अजूनही दहशतवादी आणि स्थानिक पोलिसांमध्ये संघर्ष सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. स्थानिक न्यूज 'बलुचिस्तान पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या ग्वादार शहरात स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. (Chinese Engineers Attacked in Balochistan liberation army Pakistan convoy terrorist killed)
रिपोर्टनुसार, शहरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी चिनी अभियंत्यांवर हल्ला झालेल्या घटनेची पुष्टी केली आहे. चिनी अभियंत्यांवरील हल्ला फकीर कॉलोनीच्या जवळ झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्स उभारले आहेत. अजूनही पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु असल्याचं सांगण्यात आलंय.
पाकिस्तानमधील चीनच्या राजदुतांनी चिनी नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. माहितीनुसार, चिनी अभियंत्यांच्या चमुवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ विरोधी हल्ला सुरु केला.त्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. काही दहशतवादी जखमी अवस्थेतच पळून जाण्यात यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलंय. हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसात पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ला होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. विषेश करुन पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात हे हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानाच्या ग्वादार बंदराचा विकास चीनकडून केला जात आहे. मागील वर्षी मे महिन्यात चिनी लोकांना घेऊन जाणाऱ्या एका मिनीबसवर एका बुरखाधारी महिलेने आत्मघातकी हल्ला केला होता. त्यात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.