गेल्या काही वर्षांमध्ये चीनमधील लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या वर्षी तर जन्म दर निच्चांकी पातळीवर होता. त्यामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे सरकार अधिकाधिक नागरिकांना मुले जन्माला घालण्यासाठी प्रोहत्साहीत करत आहे.
चीनने लोकसंख्या वाढवण्यासाठी चार कलमी कार्यक्रम आखला आहे. ज्याद्वारे चीनमधील महिलांना प्रसूती विमा, प्रसूती रजा, सबसिडी आणि मुलांसाठी वैद्यकीय सेवा मोफत देण्यात येणार आहे.