Chris Hipkins : न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी ख्रिस हिपकिन्स यांची वर्णी लागण्याची शक्यता

Chris Hipkins
Chris Hipkins
Updated on

नवी दिल्ली - लेबर पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी नामांकन मिळालेले आणि एकमेव उमेदवार म्हणून उदयास आलेले ख्रिस हिपकिन्स हे न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्या जागी विराजमान होणार आहेत. रविवारी होणाऱ्या लेबर पक्षाच्या ६४ खासदारांच्या अर्थात कॉकसच्या बैठकीत हिप्किन्स यांना नवे नेते म्हणून निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. (Chris Hipkins set to replace Jacinda Ardern as New Zealand prime minister)

Chris Hipkins
Crime News : शिक्षकाने विद्यार्थीनीला कॉपीगर्ल म्हटलं; तिने केलं असं काही की...

आर्डर्न यांनी गुरुवारी म्हटलं होतं की, देशाचे नेतृत्व करण्यासाठीच्या शर्यतीत मी नाही. त्यामुळे राजीनामा देईन आणि पुन्हा निवडणूक लढवणार नाही.

२००८ मध्ये लेबर पक्षाकडून पहिल्यांदा संसदेत निवडून आलेले ४४ वर्षीय हिपकिन्स नोव्हेंबर २०२० मध्ये कोविड-१९ चे मंत्री म्हणून नियुक्त झाले होते. महामारीच्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हिपकिन्स सध्या पोलीस, शिक्षण आणि लोकसेवा मंत्री तसेच सभागृह नेते आहेत.

स्थानिक माध्यमांनुसार शुक्रवारी घेतलेल्या होरायझन रिसर्च स्नॅप पोलमध्ये असे दिसून आले की, हिपकिन्स हे मतदारांमध्ये सर्वात लोकप्रिय संभाव्य उमेदवार आहेत. रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत लेबर पक्षाच्या खासदारांनी हिपकिन्स यांना दुजोरा देणे ही औपचारिकता ठरण्याची शक्यता आहे.

Chris Hipkins
Accident News : जम्मू-काश्मीरच्या बिलावरमध्ये भीषण अपघात, 5 ठार, 15 गंभीर जखमी

हिपकिन्स यांची नियुक्ती होण्यापूर्वी आर्डर्न गव्हर्नर जनरलकडे आपला राजीनामा सादर करतील. शनिवारी दुपारी ते पहिली पत्रकार परिषद घेणार आहेत. यावर शिक्कामोर्तब झाल्यास पक्षाचा कार्यकाळ संपेपर्यंत हिपकिन्स पंतप्रधान राहतील.

न्यूझीलंडमध्ये येत्या १४ ऑक्टोबरला सार्वत्रिक निवडणुका होणार असून, काही सर्वेक्षणांमध्ये लेबर पक्षाला सत्ता राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. आर्डर्न यांच्या राजीनाम्याच्या घोषणेपूर्वीच्या आकडेवारीच्या आधारे शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या करदात्यांच्या युनियन-क्युरिया सर्वेक्षणात लेबर पक्षाची लोकप्रियता ३१.७ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे दिसून आले, तर विरोधी न्यूझीलंड नॅशनल पार्टीला ३७.२ टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.