कॅलिफोर्नियात दुष्काळाच्या झळा; पाण्यासाठी घेतायत दीड कोटींचे मशीन

Drought in California
Drought in Californiaesakal
Updated on
Summary

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला दुष्काळाचा (Drought in California) मोठा सामना करावा लागतोय.

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला दुष्काळाचा (Drought in California) मोठा सामना करावा लागतोय. अशा स्थितीत येथील लोक त्यांच्या घरात पाणी बनवण्याचे मशीन (हवेतून पाणी) बसवत आहेत. 'एपी' या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, हवामान बदलामुळे (Climate Change) उत्तर आणि दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दुष्काळ पडलाय. अशा परिस्थितीत, हवेतून पाणी बनवणाऱ्या मशीन्सची मोठ्या संख्येने खरेदी होत असल्याने पृथ्वीच्या भविष्यावर मोठा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

ही मशीन एअर कंडिशनरप्रमाणे काम करते. शिवाय, याची कॉइल्स हवा थंड करुन बेसिनमध्ये पाणी साठवते. इंजिनीअर टेड बोमेन यांनी ही मशीन डिझाइन केलीय. सध्या त्सुनामी प्रॉडक्ट्स, (Tsunami Products) वॉशिंग्टनच्या माध्यमातून याची विक्री होत आहे. हवेतून पाणी बनवणं हे एक विज्ञान आहे. या मशीनच्या मदतीनं आपण तेच करत आहोत. त्सुनामी प्रॉडक्ट्स कंपनीचे हे उत्पादन आर्द्रतेतून पाणी काढण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या अनेक प्रणालींपैकी एक आहे, असे बोमेन सांगतात. या मशीनमध्ये सौर ऊर्जा पॅनेल आणि जहाज कंटेनर बसवण्यात आलाय. ही मशीन हवेतील ओलावा काढून, त्यातून बाहेर पडणारे पाणी फिल्टर करून पिण्यायोग्य बनवते. ही मशीन घर, कार्यालये, पशु फार्म आणि इतर अनेक ठिकाणी वापरली जाऊ शकते, असेही बोमेन सांगतात.

Drought in California
प्रियंका चोप्राच्या अमेरिकन नवऱ्याचा देवतांवर खूप 'विश्वास'
Drought in California
Drought in California

ही मशीन धुके असलेल्या भागात चांगले कार्य करु शकते. त्याच्या कार्यक्षमतेनुसार, ही मशीन एका दिवसात 900 ते 8,600 लिटर पाणी बनवू शकते. मात्र, ही मशीन आपल्या खिशाला परवडणारी नाही. याची किंमत 30 हजारपासून 2 लाखपर्यंत (सुमारे 22 लाख ते 1.5 कोटी) उपलब्ध आहे. परंतु, तरीही कॅलिफोर्नियातील काही लोक त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही मशीन खरेदी करत आहेत. कॅलिफोर्नियातील अनेक भागात रहिवाशांना पाण्याचे संवर्धन करण्यास सांगितलं गेलंय. बेनिशियामध्ये राहणारा डॉन जॉन्सन सांगतो, की त्यानं सर्वात लहान मशीन खरेदी केली. जॉन्सनला आशा होती, की उंच एसी युनिटसारखे हे मशीन त्याच्या बागेला हिरवेगार ठेवण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करेल. परंतु, या मशीननं त्याची बाग व घरच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करुन दिले, त्यामुळे तो खूप खूश आहे. हे मशीन तुमच्यासाठी पाण्याच्या बाटल्यांवर जितके पैसे खर्च कराल, त्यापेक्षा खूप कमी पैशात तुमच्यासाठी पाणी बनवेल, असं जॉन्सन सांगतो.

Drought in California
ऑलिम्पियन नीरज चोप्राची Style भाल्यापेक्षा महागडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.