ब्ला.. ब्ला.. ब्ला..; हवामान बदलावरून जगातील नेत्यांवर ग्रेटाचा संताप

ब्ला.. ब्ला.. ब्ला..; हवामान बदलावरून जगातील नेत्यांवर ग्रेटाचा संताप
Updated on
Summary

जगभरातील नेत्यांकडून हवामान बदलासाठी फक्त पोकळ आश्वासने दिली जात असल्याचं ग्रेटाने म्हटलं आहे

हवामान बदलावर काम करणारी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने पुन्हा एकदा जगातील दिग्गज नेत्यांना सुनावलं आहे. गेल्या तीस वर्षात जगात विकसित देशांच्या दिग्गजांनी नुसतीच पोकळ आश्वासने दिली आणि मोकळ्या गप्पा मारल्या असं तिने म्हटलं आहे. माणसाला राहण्यासाठी दुसरं असं जग नाहीय. विकसित देश हवामान बदलांसबंधी गरीब देशांना मदत करताना हात आखडता घेतात. नुसती तोंडाची वाफ घालवतात अशा शब्दांत ग्रेटाने इटलीतील युथ फॉर क्लायमेट या कार्यक्रमावेळी संताप व्यक्त केला.

इटलीमध्ये ग्लासगो इथं COP20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात याठिकाणी संयुक्त राष्ट्रांची हवामान बदलावर एक उच्च स्तरीय बैठकसुद्धा होणार आहे. त्याआधी युथ फॉर क्लायमेट परिषद आयोजित केली आहे. त्यात ग्रेटासह वनेसा नॅकतेसुद्धा सहभागी झाली आहे. या व्यासपीठावरून जगभरातील नेत्यांकडून हवामान बदलासाठी फक्त पोकळ आश्वासने दिली जात असल्याचं ग्रेटाने म्हटलं आहे

ब्ला.. ब्ला.. ब्ला..; हवामान बदलावरून जगातील नेत्यांवर ग्रेटाचा संताप
पाकिस्तानात १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे; भारत निम्म्यांच्या रडारवर

ग्रेटा म्हणाली, विकसित देशांनी हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी इतर देशांना मदतीचं आश्वासन दिलं पण ते पूर्ण केलं नाही. हवामान बदलाशी लढण्यासाठी आर्थिक मदत दिली नाही. यासाठी फक्त आश्वासनं दिली आणि पूर्ण न केलेल्या य़ा आश्वासनांसाठी एकमेकांचे आभारसुद्धा मानतात.

ग्रीन इकॉनॉमी, २०५० पर्यंत नेट झिरो, क्लायमेट न्यूट्रल या शब्दांचा वापर करून फक्त मोठं बोलणं जगभरातील नेत्यांकडून बोललं जातं. ऐकायला हे बरं वाटत असलं तरी त्यावर प्रत्यक्षात मात्र काम होतं नाही. नेत्यांच्या या पोकळ आश्वासनांमध्ये आमच्या आशा आणि स्वप्नं बुडाली असल्याचंही ग्रेटाने म्हटलं. आता या नेत्यांकडे आश्वासनं देण्यासाठी फक्त ३० वर्षे उरली आहेत आणि त्यांच्या मागून आपलीही फरपट होत असल्याची भावना ग्रेटाने या कार्यक्रमात व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.