Eknath Shinde in Davos: दावोसमध्ये 4 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार; CM शिंदेंनी सांगितलं कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या शिष्टमंडळासह दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी गेले आहेत.
Eknath Shinde
Eknath Shinde
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या शिष्टमंडळासह दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी गेले आहेत. या ठिकाणी जगभरातील गुंतवणूकदार तसेच गुंतवणूक आपल्याला मिळावी यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी भाग घेतात. याठिकाणी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार इच्छुक असून अपेक्षेपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (cm eknath shinde in davos over 4 lakh crore investment mous signed for maharashtra)

दावोसचा फोरम चांगला

याठिकाणी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री (CM Eknath Shinde in Davos) म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये गुंतवणुकीसाठी मोठा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो. यामध्ये अनेक देश आणि तिथली राज्ये सहभाग घेतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसायांचे सामजस्य करार होतात. तसेच या ठिकाणी नवं तंत्रज्ञान आणि पर्यावरणाबाबतही चर्चा होते. त्यामुळं हा एक चांगला फोरम आहे.

Eknath Shinde
Uday Samant: दाओस दौऱ्यासाठी इतक्या लोकांची गरज काय? आदित्य ठाकरेंच्या सवालाला सामंतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, जरा...

दोन दिवसांत ४ लाख कोटींचे करार

या ठिकाणी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी (maharashtra investment) अनेक जण इच्छुक असल्याचं आम्हाला दिसलं. या ठिकाणी ओमान, युएई, दक्षिण कोरियाचे लोक आले आहेत. इतरही अनेक देशांचे प्रतिनिधी आहेत. त्याचबरोबर आपले जे उद्योगपती आहेत त्यांपैकी जिंदाल, मित्तल, अदाणी (adani) देखील आले आहेत. काल आणि आज आपले चांगले सामंजस्य करारांवर सह्या झाल्या. आम्हाला अपेक्षा होती ३ लाख कोटींपर्यंत करार होतील पण काल आणि आज ४ लाख कोटींहून अधिक किंमतीचे करार झाले.

Eknath Shinde
Eknath Shinde: २० जानेवारीला मराठे मुंबईकडे कूच करणार...; जरांगेंच्या भूमिकेवर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इच्छुक

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी गुंतवणुकदारांनी खूपच इच्छा व्यक्त केली. कारण महाराष्ट्र त्यांच्यासाठी खूपच आवडतं ठिकाण आहे. कारण महाराष्ट्रातील आपलं उद्योग धोरणं (maharashtra investment policy) हे खूपच लवचिक असं धोरण आहे. आपल्याकडील सर्व लोक खूपच सकारात्मक, सहकार्य भावना असलेले आहेत. तसेच राज्य सरकार उद्योगांसाठी रेड कार्पेट टाकत असल्यानं अनेक गुंतवणुकदार महाराष्ट्राकडं येत आहेत.

Eknath Shinde
Maharashtra Politics : सुशिलकुमार म्हणतात मला भाजपची ऑफर... गिरीश महाजनांनी केलं स्वागत; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?

डबल इंजिन सरकारमुळं फायदा

तसेच सर्वजण जाणून आहेत की, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे संबंध खूपच चांगले आहेत. इथं डबल इंजिनंच (double engine govt) सरकार काम करत आहे. त्यामुळं दीड वर्षात वेगानं पायाभूत सुविधा सुरु आहेत. महाराष्ट्रात देशाच्या जीडीपीत मोठा वाटा आहे. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रात अव्वल आहे. तसेच पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला (pm modi maharashtra) मदत करत आहेत. सगळीकडं महाराष्ट्राचा गौरव केला जात आहे. त्यामुळं दावोसचा दौरा आमच्यासाठी फलद्रूप ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.