चिनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना होऊन आज १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. या मुहुर्तावर चीनमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पक्षाचे महासचिव शी जिनपिंग उपस्थित होते.
बिजिंग- चिनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना होऊन आज १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. या मुहुर्तावर चीनमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पक्षाचे महासचिव शी जिनपिंग उपस्थित होते. यावेळी चिनी सैन्याचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी शी जिनपिंग यांनी त्यांच्या विरोधात जाणाऱ्या देशांना सज्जड दम देत ठेचण्याची भाषा केली. गेल्या १०० वर्षांच्या कार्यकाळात चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने अनेक चढउतार पाहिले आहेत. कम्युनिस्ट पार्टीचा प्रवास कसा राहिलाय हे थोडक्यात जाणून घेऊया. (communist party of china 100 year journey 1921 to 2021 mao zedong xi jinping)
१९१७ मध्ये सोवियत संघातील लेनिन यांच्या नेतृत्वातील ऑक्टोबर समाजवादी क्रांती यशस्वी झाली. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीची विचारधारा चीनमध्ये पसरु लागली. चीनमध्ये १९१९ मध्ये साम्राज्यवाद आणि सामंतवाद याविरोधात आंदोलन सुरु झाले. यावेळी कामगार वर्ग मोठी ताकद म्हणून पुढे आला. चीनमध्ये कामगारांची व्यवस्थित रचना करण्यासाठी आणि मार्क्सवादाला पसरवण्यासाठी माओत्से तुंग यांनी १९२१ मध्ये कम्युनिस्ट समुहाची स्थापना केली. जुलै १९२१ मध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या पहिल्या काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. याला अधिकृतरित्या पक्षाच्या स्थापनेचा वर्ष मानण्यात आलं.
१९३४ चे लाँग मार्च
चीन कम्युनिस्ट पार्टीच्या इतिहासात १९३४ च्या लाँग मार्चचे विशेष स्थान आहे. १६ ऑक्टूबर १९३४ ला सुरु होऊन हा लाँग मार्ग २० ऑक्टोंबर १९३५ पर्यंत चालला. यात चांग काई शेक यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी कुमिंगतांग पार्टीच्या सैन्याने कम्युनिस्टांच्या लाल सैनेला ९ हजार किलोमीटर मागे ढकलले. वास्तवात हा लाँग मार्च हा अनेक भागामध्ये विभागला होता. ज्यात जिआंगशी प्रांतातून सुरु झालेला मार्च सर्वाधिक प्रसिद्ध होता. हा मार्च माओत्से तुंग आणि चाऊ एनलाईचे यांच्या नेतृत्वात करण्यात आला. ज्यात लाल सेना पश्चिम चीनचे दुर्गम क्षेत्र पार करत शान्शी प्रांतात पोहोचली. हा लाँग मार्च सुरु झाला त्यावेळी कम्युनिस्ट पार्टीचे १ लाख सैनिक होते, मार्चच्या शेवटी केवळ २० टक्के सैनिक जिवंत राहिले होते. यावरुन मार्च किती खडतर होता हे समजून येईल.
१९४९ मध्ये चीनवर ताबा
१९३७ मध्ये चीनवर जेव्हा जपानने आक्रमण केले तेव्हा कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी सेना एकत्र आली. परंतु, जपानसोबत हरल्यानंतर या दोघांमध्ये गृहयुद्ध सुरु झाले. यादरम्यान कम्युनिस्ट पार्टी वरचढ ठरली आणि १९४९ मध्ये संपूर्ण चीनवर माओत्से तुंग यांची सत्ता स्थापित झाली. यानंतर चांग काई यांच्या नेतृत्वातील सरकारने मुख्य भूमी सोडून एका द्विपावर आश्रय घेतला. या द्वीपाला आज तैवान म्हणून ओळखलं जातं. तैवान स्वत:ला एक स्वतंत्र राष्ट्र सांगते, पण चीनने याला मान्यता दिलेली नाही.
१९६६ ची सांस्कृतिक क्रांती
माओत्से तुंग यांनी १९६६ मध्ये चीनने राजकीय आंदोलनाच्या स्वरुपात सांस्कृतिक क्रांती सुरु केली. १६ मे १९६६ सुरु झालेली ही क्रांती १० वर्षांपर्यंत चालली आणि यामुळे चीनमध्ये सामाजिक स्तरावर अनेक महत्त्वाचे बदल झाले. माओ आणि त्यांच्या समर्थकांनी जुने रितीरिवाज, पंरपरा, संस्कृती आणि जुना विचार नष्ट करण्यास सुरुवात केली. यामुळे चीनच्या सामाजिक रचनेचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान रेड गार्डच्या अत्याचारामुळे दोन वर्षांच्या काळात लाखो लोकांचा मृत्यू झाला.
नवे माओ बनले शी जिनपिंग
६८ वर्षीय शी जिनपिंग गेल्या ९ वर्षांपासून कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव राष्ट्रपती आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रपतीपदावर राहण्याची मर्यादा संपवली. त्यामुळे ते २०३३ पर्यंत महासचिवपद सोडण्याची शक्यता नाही. चीनमध्ये शी जिनपिंग यांना माओ आणि देंग शियाओपिंगनंतर तिसरे मोठे नेते मानले जातात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.