United Nations General Assembly : धुळीच्या वादळांचा सामना करा; आगामी दशक उपाययोजनांचे,आमसभेत प्रस्ताव मंजूर

हवामान बदलामुळे जगभरात तीव्र नैसर्गिक आपत्ती किंवा घटना घडत आहेत. मध्य आफ्रिकेपासून ते चीनच्या उत्तर भागापर्यंत अनेक ठिकाणी धुळीची वादळे निर्माण होण्याच्या घटनाही वाढल्या असून त्याचा आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांच्यावर परिणाम होत आहे.
Dust Storm
Dust Stormsakal
Updated on

न्यूयॉर्क : हवामान बदलामुळे जगभरात तीव्र नैसर्गिक आपत्ती किंवा घटना घडत आहेत. मध्य आफ्रिकेपासून ते चीनच्या उत्तर भागापर्यंत अनेक ठिकाणी धुळीची वादळे निर्माण होण्याच्या घटनाही वाढल्या असून त्याचा आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांच्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे २०२५ ते २०३४ ही दहा वर्षे वाळू आणि धुळीच्या वादळांचा सामना करण्याचे दशक म्हणून जाहीर झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला.

चीन आणि विकसनशील देशांच्या गटाने याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. धूळ आणि वाळूच्या वादळांमुळे होणारी हानी टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर सहकार्य होणे आवश्‍यक असल्याचे मत चीनने यावेळी व्यक्त केले. हा प्रस्ताव आमसभेने बहुमताने स्वीकारला. मागील काही वर्षांमध्ये धुळीची आणि वाळूची वादळे निर्माण होण्याचे प्रमाण वाढले असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी २०२२ मध्ये प्रकाशित केला होता. अशा वादळांमुळे श्‍वसनाचे विकार वाढतात, पिकांचे नुकसान होते आणि वाळवंटीकरणाचा वेग वाढतो. या वादळांच्या परिणामांची फारशी नोंद होत असल्याने माहिती मर्यादित असल्याचेही या अहवालात म्हटले होते.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी साधारणपणे दोन हजार अब्ज टन वाळू आणि धूळ वातावरणात मिसळत असते. कोरड्या आणि दमट हवामान असलेल्या प्रदेशात हे प्रमाण अधिक असते. ही वादळे ही नैसर्गिकरित्याच तयार होत असली तरीही दुष्काळ आणि पर्यावरण बदलामुळे त्यांची तीव्रता वाढते. अहवालानुसार, वातावरणात मिसळणाऱ्या एकूण धुळीमध्ये २५ टक्के धूळ मानवी हस्तक्षेपामुळे मिसळली जाते.

आगामी दशकात काय करणार?

  • आपत्तीबाबत इशारा देणारी यंत्रणा अधिक अद्ययावत करण्यासाठी जागतिक सहकार्य मिळविणार

  • धुळीच्या वादळांबाबत मिळालेल्या माहितीचे आदानप्रदान

  • सदस्य देशांनी शाळांमधून जनजागृती करावी

  • तापमानवाढ कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांना वेग आणणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.