शिकागो: सलग दुसऱ्या वर्षी पृथ्वीवरील वातावरण सर्वाधिक उष्ण राहणार आहे. तसेच, यंदा प्रथमच औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत तापमानवाढ १.५ अंशांच्यावर गेले असल्याचे ‘कोपर्निकस’ या युरोपीय हवामान संस्थेने म्हटले आहे. निसर्ग आपल्याला वारंवार इशारे देत असून अद्यापही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, अशी खंत या संस्थेचे संचालक कार्लो ब्युन्टेम्पो यांनी व्यक्त केली आहे.