Borneo Elephant : ‘कोपिआपोआ कॅक्टी’, ‘बोर्निओ हत्ती’चे अस्तित्व धोक्यात

जगातील ४५ हजार प्राणी, वनस्पती नामशेष होणार; ‘आययूसीएन’ची रेड लिस्ट प्रसिद्ध
copiapoa kakti and borneo elephant
copiapoa kakti and borneo elephantsakal
Updated on

अबुजा (नायजेरिया) - वैश्विक तापमानवाढ, नव्या आक्रमक प्रजातींचे वाढलेले प्रमाण, बेकायदा व्यापार आणि तस्करी तसेच पायाभूत सेवांचा विस्तार यांच्यामुळे जगातील अनेक प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जगभरातील ४५ हजार प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्यात यंदा एक हजार नव्या प्रजातींची भर पडली आहे.

‘इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संघटनेने सध्या ज्यांच्या अस्तित्वालाच धोका आहे अशा प्रजातींची रेड लिस्ट प्रसिद्ध केली आहे. या नव्या यादीसोबत संस्थेने काही यशकथांचीही नोंद घेतली आहे. यात प्रामुख्याने ‘लिंक्स’ प्रजातीच्या मांजराला वाचविण्यात यश आले आहे.

ज्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे अशा प्रजातींच्या यादीत १ लाख ६३ हजार ०४० प्रजातींचा समावेश असून त्यात मागील वर्षी सहा हजार प्रजातींची भर पडली आहे. चिलीच्या अटाकामा वाळवंटामध्ये आढळणारे ‘कोपिआपोआ कॅक्टी’ प्रजातीचे निवडुंग, ‘बोर्निओ हत्ती’ आणि ‘ग्रॅन कॅनरिया लिझार्ड’ या सरड्याचा धोका नामशेष होत असलेल्या प्रजातींच्या यादीत समावेश झाला आहे. विशेष म्हणजे समाजमाध्यमांचा वापर हे पक्षी आणि प्राण्यांच्या मुळावर आल्याचे दिसून आले.

समाजमाध्यांचा धोका

‘कोपिआपोआ कॅक्टी’ या वनस्पतीचा वापर हा प्रामुख्याने घरातील सुशोभीकरणासाठी केला जातो. समाजमाध्यमांमुळे या वनस्पतीची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे. अनेक उत्साही नेटीझन्स या वनस्पतीची जाहिरात करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करत असल्याचे दिसून आले.

जगातील ८२ टक्के प्राण्यांच्या प्रजातींना धोका निर्माण झाला असून २०१३ मध्ये हे प्रमाण ५५ टक्के एवढे होते. युरोप आणि आशियामध्ये ‘चिलीतील कॅक्टी’ला मोठी मागणी असल्याने त्याच्या तस्करीत वाढ झाली आहे. अटाकामा परिसरामध्ये नागरी वसाहती वाढल्याने हे निवडुंग सहज उपलब्ध होऊ लागले असून त्याची बाजारात अव्वाच्या सव्वा दराला विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे.

जंगल घटल्याने हत्ती अडचणीत

आशियायी बोर्निओ हत्तीचा देखील नामशेष होत असलेल्या प्राण्यांच्या प्रजातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्या जगात या प्रजातीचे केवळ एक हजार एवढेच हत्ती राहिल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या हत्तींचा अधिवास संपुष्टात आल्याने त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

कृषी, खाणी आणि पायाभूत सेवा, तस्करी आणि वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा या हत्तींना मोठा धोका निर्माण झाला आहे. कॅनरी आयलंड आणि इबिथा बेटावर सापांची संख्या वाढल्याने तेथील ‘ग्रॅन कॅनरिया लिझार्ड’ या सरड्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

‘लिंक्स’ ची संख्या वाढली

‘लिंक्स’ मांजराच्या संरक्षण आणि संवर्धनासाठीच्या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे दिसून आले आहे. २००१ मध्ये या मांजरांची संख्या ६४८ एवढी होती त्यात वाढ होऊन ती २०२२ मध्ये २००० वर पोचल्याचे दिसून आले आहे. या मांजरींचे २०१० मध्ये पोर्तुगाल आणि स्पेनमध्येही पुनर्वसन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.