नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाबरोबरच चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढल्यामुळे शेअर बाजारावरही मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. चीनच्या (China) अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे शेअर्स सोमवारी मोठ्या प्रमाणावर घसरले. याचा थेट परिणाम चीनच्या सर्वात श्रीमंत व्यक्त झोंग शानशेन यांच्या संपत्तीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले.
पाच अब्ज डाॅलर संपत्ती घटली
हाँगकाँगच्या शेअर बाजारात झोंग शानशेनची कंपनी नोंगफू स्प्रिंग कंपनीच्या (Nongfu Spring Co.) शेअरमध्ये ९.९ टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. त्यांच्या कंपनीची नोंदणी झाल्यावर १८ महिन्यांमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी घसरण आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaire Index) त्यांच्या एकूण संपत्तीत ५ अब्ज डाॅलरने (जवळपास ३८२.५ अब्ज रुपये) घसरण झाली आहे. मात्र ६०.३ अब्ज डाॅलरची (जवळपास ४ हजार ५९० अब्ज रुपये) संपत्तीसह ते आताही चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. (Corona Hit China, Share Market Collapsed Richest Chinese Zhong Shanshan Loss 5 Billion Dollar)
नोंगफू कंपनी लिमिटेडचे शेअर गेल्या ५ दिवसांमध्ये १४.३४ घसरले आहेत. झोंग शानशेन व्यतिरिक्त चीनच्या इतर अनेक श्रीमंत उद्योगपतींच्या संपत्तीत घसरण नोंदवली गेली आहे. टेंसेंट कंपनीचे मालक मा होअतुंग यांच्या संपत्तीत ३.३३ अब्ज डाॅलर आणि अलिबाबाचे जॅक मा यांची ९९.३ कोटी डाॅलरची घट नोंदवली गेली आहे.
चीनमध्ये कोरोना नियंत्रणा बाहेर
चीनमध्ये कोरोनाची (Corona) स्थिती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहे. येथे कोरोनाचे सर्व विक्रम मोडू लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये येथे कोरोनाचे ५ हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत चीनमध्ये कोरोनाचे एका दिवसात इतकी मोठी रुग्णसंख्या नोंदवली गेलेली नाही. चीनने झिरो कोरोना धोरण अवलंबत बऱ्यात प्रांतांमध्ये लाॅकडाऊन लावले आहे. यामुळे जवळपास ५ करोड लोक आपल्या घरात कैद झाले आहे. वृत्तसंस्थांनुसार, चीनमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजार २८० नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.