लंडन : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोनाला नष्ट करण्यासाठी विविध देश पुढाकार घेत आहे. शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असून, सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी कोरोना कधी नष्ट होणार याबाबत संकेत दिले आहेत.
जगभरात कोरोनाची 53 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून, 3 लाख 42 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून व्हायरल झालेल्या कोरोनाने जगभरात धुमाकूळ घाताल आले. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिका या देशांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे कोरोनावर लवकरात लवकर लस शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सिंगापूरच्या काही शास्त्रज्ञांनी जगभरातील काही देशांबाबत भाकित केले आहे. यावरून 30 सप्टेंबरपर्यंत ब्रिटनमधून कोरोनाचा सर्वनाश होईल, असे सांगितले आहे. सिंगापूर यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिजाइनच्या (SUTD) शास्त्रज्ञांनी आपल्या एका अभ्यासात काही तारखा जाहीर केल्या आहेत. यात पुढील 4 महिन्यात ब्रिटनमधून कोरोनाचा सर्वनाश होऊ शकतो. 24 ऑक्टोबरपर्यंत इटलीमध्ये कोरोना विषाणूचा पूर्णपणे नाश होईल. 11 नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेत व्हायरसचा अंत होईल. सिंगापूरमध्ये 27 ऑक्टोबरपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपेल, असा शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला आहे.
शास्त्रज्ञांनी कोरोनाबाबत भविष्यवाणी केली असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याबरोबरच काळजी घेणेही महत्त्वाचे आहे, असे सांगितले आहे. 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, सेंटर फॉर एविडेंस बेस्ड मेडिसीनच्या प्राध्यापकाने म्हटले आहे की, जर संक्रमण आणि मृत्यूचा हा दर कायम राहिला तर जून अखेरीस या आजारामुळं मृतांची संख्या कमी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.