२०२४ पर्यंत राहू शकतो कोरोना!; कंपनीने व्यक्त केली चिंता

पुढील वर्षापर्यंत किंवा दोन वर्षांपर्यंत कोरोना महामारी कायम राहील
omicron
omicronomicron
Updated on

कोरोना विषाणूच्या (coronavirus) ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे जग चिंतेत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह G-7 देशांच्या आरोग्य मंत्र्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनच्या (omicron variant) वाढत्या वेगाच्या पार्श्वभूमीवर लस उत्पादक कंपनी फायझरने इशारा दिला आहे की, कोरोना महामारी २०२४ पर्यंत (The pandemic could last until 2024) कायम राहू शकते.

मागच्या महिन्यात ओमिक्रॉन आल्यानंतर फायझरला अंदाज आला आहे की, संक्रमणाचा दर जास्त आहे. कोरोनाच्या (coronavirus) लसीच्या दोन डोस संक्रमण होण्यापासून थांबवू शकत नाही. यामुळेच जगभरात ओमिक्रॉन वेगाने पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पुढील वर्षापर्यंत किंवा दोन वर्षांपर्यंत कोरोना महामारी कायम राहील. या काळात संसर्ग इतर देशांमध्येही पसरेल, असे कंपनीला वाटत असल्याचे फायझरचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी माइकल डॉलस्टन यांनी सांगितले.

omicron
हनिमूनसाठी भेट द्या महाराष्ट्रातील या ठिकाणांना

२०२४ पर्यंत जगभरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची अपेक्षा (The pandemic could last until 2024) आहे. हे किती वेगाने वाढेल आणि किती नाही, हे लस घेण्याची गती आणि उपचारांवर अवलंबून राहील. यामुळे कमी लसीकरण झालेल्या देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असे माइकल डॉलस्टन (Concerns expressed by the company) म्हणाले.

कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन (omicron variant) येण्यापूर्वी यूएस रोग चिकित्सक अँथनी फाउसी यांनी भाकीत केले होते की, युनायटेड स्टेट्समधील साथीचा रोग २०२२ मध्ये संपेल. परंतु, नव्या प्रकाराचा संसर्गाचा वेग पाहता हा अंदाज खोटा ठरू शकतो, असे वाटत आहे.

omicron
आक्षेपार्ह व्हिडिओने तणाव; भाजप-सेनेच्या नेत्यांचा ठिय्या

फायझरची पॅक्सलोव्हिड जास्त प्रभावी

फायझरकडे पॅक्सलोव्हिड नावाची प्रायोगिक अँटीव्हायरल गोळी आहे. या गोळीने क्लिनिकल चाचण्यांमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि उच्च-जोखीम असलेल्या व्यक्तींमधील मृत्यू जवळजवळ ९० टक्क्यांनी कमी केला आहे. रिफिनिटिवच्या IBES डेटानुसार, पुढील वर्षी याची विक्री १५ बिलियन डॉलर ते २५ बिलियन डॉलरमध्ये होण्याची शक्यता आहे. यूएस कंपनी फायझरने जर्मनीच्या बायोएनटेक एसईसोबत स्वतःची कोविड-19 लस विकसित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.