कोरोनाबाधित गर्भवती महिलांना 'स्टिलबर्थ'चा धोका | US Study

pregnant woman
pregnant womanesakal
Updated on

नवी दिल्ली : कोरोनाबाधित (coronavirus affected) गर्भवती महिलांना बाळंतपणात अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच स्टिलबर्थ (Stillbirth) म्हणजेच, गर्भपात होण्याचा धोकाही अधिक असतो. याबाबत अमेरिका सरकारने (US Government) एका मोठ्या संशोधनातून खुलासा केला आहे. काय म्हटलंय नेमकं?

गर्भवती महिलांना कोरोनाची बाधा

युएस स्टडीमध्ये म्हटलंय, कोरोनाबाधित न झालेल्या गर्भवती महिलांपेक्षा ज्या गर्भवती महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यांना बाळंतपणात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यासोबतच या संशोधनात म्हटलं गेलं आहे की, डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) ची लागण झाल्यानंतर हा धोका जवळपास चार पटींनी अधिक वाढतो. सेंटर्स फॉर डिजीज अँड प्रिवेंशन (Centers for Disease Control and Prevention) चं हे विश्लेषण मार्च 2020 आणि सप्टेंबर 2021 मध्ये अमेरिकेच्या एका मोठ्या रुग्णालयात झालेल्या 1.2 दशलक्ष प्रसूतींवर आधारित होतं.

संशोधनातून दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित मातांनी मृत बालकांना जन्म दिल्याची प्रकरणं अत्यंत दुर्मिळ होती. सरासरी हा दर 0.65 टक्के होता. परंतु, कोरोनाचा संसर्ग झालेल्या मातांमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या आधी स्टिलबर्थ 1.47 पटींनी अधिक सामान्य होतं. डेल्टा व्हेरियंटनंतर हे प्रमाण 4.04 पटींनी अधिक आणि समग्र रुपात 1.90 पटींनी अधिक होतं.

pregnant woman
शेतकऱ्यांनो, नाव नोंदवा अन्‌ दरवर्षी मिळवा 6000 रुपये!

संशोधकांनी संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या संशोधनात असं सुचवलं होतं की, वाढीव जोखीम होण्याचं संभाव्य जैविक कारण नाभीसंबधीचा दाह किंवा रक्त प्रवाह कमी होण्याचा परिणाम असू शकतो. ते म्हणाले की, "कोरोनामुळे (Corona) स्टिलबर्थचा धोका वाढतो. कोरोनाबाधित मातांची प्रसूती अधिक गुंतागुंतीची होते, तसेच अनेक समस्या उद्भवतात. त्याबाबत अधिक तथ्य तपासून पाहणं गरजेचं असतं. त्यामुळे या प्रकरणात अधिक संशोधनाची गरज आहे."

pregnant woman
पंतप्रधान मोदी येणार, गॅलरीत कपडे वाळत घालू नका, पोलिसांचा आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.