सोशल डिस्टंसिंगचं उल्लंघन केल्यावर साफ करावं लागणार टॉयलेट

Coronavirus Toilet duty for Jakarta's social distancing violators
Coronavirus Toilet duty for Jakarta's social distancing violators
Updated on

जकार्ता : सोशल डिस्टन्सिंगचं वारंवार उल्लंघन करणे आता महागात पडणार आहे. सोशल डिस्टंसिंगचं उल्लंघन करणाऱ्या लोकांना आता टॉयलेट साफ करायची शिक्षा दिली जाणार आहे. इंडोनेशियामध्ये अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास शिक्षा म्हणून टॉयलेट साफ करावे लागणार आहे. लोकांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी देण्यात आलेल्या शिक्षेपैकी एक शिक्षा आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणं हा या शिक्षेमागील उद्देश आहे. अशाच पद्धतीनं मास्क न लावणाऱ्यांना 17 डॉलर्स दंड भरावा लागणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडकरांनो सांभाळा; १७ कुटुंबात कोरोनाचा शिरकाव

कोरोना व्हायरसपासून बचावाचा मार्ग म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आहे. मात्र, अद्यापही अनेक लोकं याला गांभीर्याने घेत नसल्याने इंडिनेशिया सरकारने अशी तरतूद केली आहे. दरम्यान, इंडोनेशियामध्ये आतापर्यंत १०२८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर  १५४३८ लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे देशात कोरोनाव्हायरसचा धोका अधिक वाढू नये, तो पसरू नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत. मात्र अशा परिस्थितीतही लोकं या नियमांचं वारंवार उल्लंघन करत आहेत. त्यामुळे शिक्षा देण्याबाबत निर्णय घेतले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.