कोरोनावरील लस वर्षअखेरपर्यंत शक्य

Corona-Vaccine
Corona-Vaccine
Updated on

वॉशिंग्टन - कोरोनावरील लस तयार करण्याच्या संशोधनात अमेरिकेने मोठे यश मिळविले असून, जुलै महिन्यात त्याच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ (एनआयएच) आणि ‘मॉडर्ना आयएनसी’ यांनी ही लस विकसित केली आहे. याची चाचणी ३० हजार स्वयंसेवकांवर करण्यात येणार आहे. यात काहींना प्रत्यक्ष लस टोचण्यात येणार आहे, तर काहींना अप्रत्यक्ष स्वरूपात लस देण्यात येईल. शेवटच्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण चाचण्यांसाठी पुरेशा प्रमाणात औषधांचे डोस उपलब्ध केले आहेत, असे ‘मॉडर्ना’ने सांगितले. ही लस टोचण्यापूर्वी आधीच्या टप्प्यात कमी प्रमाणात दिलेल्या औषधाच्या मात्रेचा परिणाम जाणून घेतला जाणार आहे. आत्तापर्यंत झालेला अभ्यास हा पुढील टप्प्यातील संशोधनासाठी पुरेसा आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

अन्य संशोधन पहिल्या टप्प्यात...
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठासह जगभरात संशोधन सुरू असून, ते अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. अंतिम टप्‍प्यात जाण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्यासाठी अजून चाचण्यांची गरज आहे, अशी अपेक्षा ‘एनआयएच’ने व्यक्त केली. या पैकी एकाही संशोधनातून खात्री देता येत नाही. मात्र, सर्व काही सुरळीत झाले तर या वर्षअखेरपर्यंत कोरोनावरील लस उपलब्ध होईल का, याचे सकारात्मक उत्तर देता येईल, असे मत डॉ. जॉन मास्कोला यांनी ‘नॅशनल ॲकॅडमी ऑफ मेडिसिन’च्या बैठकीत व्यक्त केले. ‘एनआयएच’च्या लस संशोधन केंद्राचे ते मार्गदर्शक आहेत.

संशोधनाचे टप्पे

  • ‘मॉडर्ना’ने सुरुवातीला मार्च महिन्यात ४५ स्वयंसेवकांवर लसीची चाचणी केली.
  • दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ३०० तरुणांची नोंदणी 
  • लसीचा परिणाम ज्येष्ठांवर कसा होताे याचा अभ्यास आता सुरू झाला आहे.
  • सुरुवातीच्या अभ्यासात लसीचे दुष्परिणाम आणि वेगवेगळ्या मात्रांना लोकांची रोगप्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते, याची चाचपणी करण्यात आली. 
  • मोठ्या प्रमाणावर चाचण्या झाल्यानंतर लस किती परिणामकारक ठरू शकते, हे समजणार आहे.
  • सरकारने विविध लसींसाठी औषधाचा मोठा साठा करण्यास सुरुवात केली आहे. 
  • शेवटच्या टप्प्यातील चाचणीत यश मिळाले की लसीकरणाला प्रारंभ करणे शक्य होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.