पाकिस्तानी लष्कराच्या जनरल्समध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे एका अहवालात उघडकीस आले. स्वित्झर्लंडमधील नोंदणीकृत गुंतवणूक बँकिंग संस्था ‘क्रेडिट सुइस’च्या आकडेवारीनुसार, लीक झालेल्या खातेधारकांत माजी ‘आयएसआय’ प्रमुख जनरलसह कितीतरी प्रमुख राजकीय नेते आणि जनरल सहभागी असल्याचे समोर आले आहेत.
पाकिस्तानी लष्कर आणि सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले चित्र आहे. जनरल रहमान यांनी 1980 च्या दशकात सोव्हिएत युनियन विरुद्धच्या लढाईला पाठिंबा देण्यासाठी अफगाणिस्तानातील मुजाहिदीनांना युनायटेड स्टेट्स आणि इतर देशांकडून अब्जावधी डॉलर्सची मदत केली होती. अफगाणिस्तानवरील सोव्हिएत युनियन विरुद्धच्या लढाईच्या नावाखाली पाकिस्तानी लष्कराच्या सर्वोच्च जनरल्सनी किती हातमिळवणी केली, हे लीक झालेले कागदपत्रात स्पष्ट दिसते. याचा दुजोरा द टाइम्स ऑफ इस्रायलने सुद्धा दिलाय.
‘क्रेडिट सुइसच्या अहवालात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचे ब्रीदवाक्य 'लोभ चांगला आहे' असे दिसुन येत आहे. आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सेवानिवृत्त जनरल्सकडुन लाचखोरी, खंडणी असे असंख्य घोटाळे तसेच स्मगलिंग रॅकेट आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतही त्यांचा सहभाग असल्याचे अहवालात उघडकीस आले आहेत
1990 च्या दशकात तत्कालीन लष्करप्रमुख अस्लम बेग आणि आयएसआय प्रमुख असद दुर्रानी यांनी भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध तसेच जगाच्या इतर देशांविरुद्ध ‘जिहाद'ला निधी देण्यासाठी स्वतःचा अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालात गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी जनरल्सचे भ्रष्ट व्यवहार आणि घोटाळ्यांचे अनेक उदाहरणे यात नमूद केले आहेत. इस्लामाबादमधील अब्जावधी रुपयांच्या गृहनिर्माण घोटाळ्यात माजी लष्करप्रमुख जनरल अशफाक कियानी यांच्या बंधूंचासुद्धा समावेश असल्याचे समोर आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.