Cotton News: पांढऱ्या सोन्याला भाव मिळत का नाहीये ? बांगलादेश अन् पाकिस्तानशी आहे थेट  कनेक्शन

Cotton Rate: ६० टक्के जिनिंग या घडीला बंद आहेत
cotton news
cotton news
Updated on

एका बाजूला प्रति क्विंटल कापसाला १० ते १२ हजार रुपये भाव मिळावा या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कापसामागे केवळ ७१०० ते ७२०० रुपये इतकाच भाव मिळत आहे. यामुळे यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

कापसाला समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवुन ठेवला आहे. याच बरोबर कापुस विक्री थांबवली आहे. यामुळे बाजारातील कापसाची आवक घटली आहे. ज्याचा थेट परिणाम हा जिनिंग व्यवसायावर देखील होत आहे. सध्या फक्तव ४० टक्के जिनिंग सुरु असून ६० टक्के जिनिंग या घडीला बंद आहेत.

cotton news
Cotton Export: तब्बल 18 वर्षानंतर पांढऱ्या सोन्याच्या निर्यातीत घसरण, काय आहे कारण?

सुत उपलब्ध

जागतिक पातळीवर सूत उद्योजकांकडे मोठ्या प्रमाणावर सध्या सुत उपलब्ध आहे. यामुळे जागतिक पातळीवर कापसाची मागणी कमी झाली आहे. भारतातून आयात करणाऱ्या (importer) देशांकडूनही सुताची मागणी कमी झाल्याने याचा थेट परिणाम हा कापसाच्या भावावर झाला (cotton rate )आहे. भारताचे सूत दर हे इतर देशांपेक्षा जास्त असल्याने भारतातील कापूस मालाला (indian cotton) कमी भाव मिळत आहे.

cotton news
Cotton Export: तब्बल 18 वर्षानंतर पांढऱ्या सोन्याच्या निर्यातीत घसरण, काय आहे कारण?

जागतिक बाजारपेठ

बांगलादेश जो भारताचा मुख्य आयातदार(impoter) आहे जिथून मोठ्या प्रमाणावर भारतातून सूत विकत घेतले जाते. त्याचीही आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे भारताच्या सूत निर्यातीवर परिणाम होत आहे. परिणामी कापसाची मागणी घटली आहे.

त्याच प्रमाणे पाकिस्तान, इंडोनेशिया, चीन व जपान या देशांकडूनही होणारी सुताची मागणी ही कमी झाली आहे. यामुळे कापसाला यंदाचा भाव चांगल्या पद्धतीवर मिळत नाही आहे.

cotton news
Nashik Cotton Crop Crisis: ‘व्हाइट गोल्ड’ची क्षेत्रवाढ; पण उत्पादन घटणार! जिरायतीला फटका

तज्ज्ञांचा सल्ला

शेतकऱ्यांना भाव वाढावा अशी अपेक्षा आहे. संक्रांतीपर्यंत हा भाव वाढेल अशी अपेक्षा शेतकरी करत जरी असले तरी देखील त्याबाबत आशादायी वातावरण पाहायला मिळत नाही. संक्रांतीनंतरही शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेल असे चित्र सध्या पाहायला मिळत असे दिसून येत नाही.

उलट शेतकऱ्यांचा घरात कापूस राहिल्याने कापसाची गुणवत्ता कमी होईल व येत्या काळात सध्या मिळत असलेल्या भावापेक्षाही कमी भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो असे म्हटले जात आहे. अश्यावेळी आपल्याकडे असलेल्या कापसापैकी काही भाग हा शेतकऱ्यांनी विकावा असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

cotton news
Cotton Crop Crisis : पाऊस लांबल्याने कापूस पीक धोक्यात; वाढत्या तापमानाचा कापूस उत्पादकांना फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.