आपल्या आयुष्यात मीठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मीठाशिवाय जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. हेच तुमच्या भाजीला चवदार आणि कधीतरी खारट बनवणारे मीठ आज वादाचा मुद्दा बनले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या विधानावरून राजकारण तापले आहे. देशवासी गुजरातचं मीठ खातात, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळेच आज नक्की कुठं कीती मीठ तयार होतं. सैधव मीठ कुठून येतं याबद्दल चर्चा करूया.
तसं बगायला गेलं तर, गुजरातमध्ये मिठाचं जास्त उत्पादन होतंय. मात्र, उपवासाला लागणाऱ्या सैंधव मिठासाठी आपल्याला पाकिस्तानावर अवलंबून राहावं लागतंय. पाकिस्तानमध्ये सैंधव मिठाचं उत्पादन जास्त होतंय. 2018-19 मध्ये भारतानं 99% पेक्षा जास्त सैंधव मीठ पाकिस्तानकडून आयात केलंय. त्यामुळं आपण उपवासासाठी पाकीस्तानाचं मीठ खातोय असं म्हणलं तर वावग ठरणार नाही.
चीन आणि अमेरिका या दोन देशात मीठ जास्त तयार होतंय. या क्रमवारीत भारताचा नंबर तिसरा येतो. 2021-22 वर्षात गुजरातमध्ये 266 लाख टनांहून अधिक मिठाचं उत्पादन झालं. यापैकी 227.65 लाख टन म्हणजेच 85% मीठ गुजरातमध्ये, तर तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये क्रमानं 17.21 लाख, 16.90 लाख टन उत्पादन झालं. यातील 76 लाख टन मीठ तूमच्या आमच्या जेवणासाठी तर, 66 लाख टन मीठ परदेशात आणि देशातील व्यापाऱ्यांना पाठवण्यात आलं.
आपण पाकीस्तानचे मीठ खातोय
मीठ तयार करण्यात आपण तिसऱ्या नंबरात असलो तरी सैंधव मिठासाठी आपण पाकिस्तानवर अवलंबून आहोत. उपवासाच्या दिवसात फराळाच्या पदार्थात घालण्यासाठी सैंधव मीठ सर्वात जास्त वापरलं जातं. उपवासाच्या वेळी मीठ, तिखट नसलेले पदार्थ खाल्ले जातात. त्यावेळी सामान्य मिठाऐवजी सैंधव मीठ खाल्लं तर चालतंय.
सैंधव मिठाचे उत्पादन पाकिस्तानात होतं. पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांतात खेवडा नावाची मिठाची मोठी खाण आहे. येथे दरवर्षी 4.5 लाख टनांहून अधिक सैंधव मिठाचं उत्पादन होतं. या मीठाला लाहोरी मीठ असंही म्हणतात.
इंडियन ब्युरो ऑफ माइन्सच्या अहवालानुसार, 2018-19 मध्ये भारतानं 74,457 टन सैंधव मीठ खरेदी केलं. यापैकी 74,413 टन म्हणजे 99% पेक्षा जास्त सैंधव मीठ पाकिस्तानकडून घेतलं. पण 2019-20 मध्ये भारतानं 60,441 टन सैंधव मीठ आयात केलं. त्यापैकी 19,037 टन 31% मीठ पाकिस्तानमधून आलं. 2019-20 मध्ये, UAE मधून सर्वाधिक 31,839 टन सैंधव मीठ आयात करण्यात आलं. UAE आणि पाकिस्तान व्यतिरिक्त इराण, मलेशिया, जर्मनी, अफगाणिस्तान, तुर्की आणि ऑस्ट्रेलिया या देशातूनही आपण सैंधव मीठ मागवतोय.
हे देश पण खातात भारताचं मीठ
2020-21 मध्ये 870 कोटी रुपयांच्या 66 लाख टन मीठाची निर्यात झाली. चीन, दक्षिण कोरिया, जपान, कतार, इंडोनेशिया, व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ आणि तैवान या देशांमध्ये भारतीय मीठ खाल्लं जातं.
मीठाशीवाय जसं जेवण चवदार होत नाही तसंच मीठ योग्य प्रमाणात न खाल्ल्यानं जीवनही बेचव होतं. याबद्दल WHO ( World Health Organization) नं सांगितलं आहे की, मीठातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सोडियम. हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्लं तर ते केवळ रक्तदाब नियंत्रणात ठेवत नाही तर हृदयविकार आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील
काय आहे प्रकरण ?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू यांनी साबरमती आश्रमात जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर झालेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू यांनी एक वक्तव्य केलं. गुजरातमध्ये देशातील 76 टक्के मीठ तयार होतं त्यामुळे देशवासी गुजरातचं मीठ खातात असं म्हणता येईल, असं वक्तव्य राष्ट्रपती मुर्मू यांनी केलं होतं.
राष्ट्रपतीने केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते उदितराज यांनी ट्विट केलं होते. या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला होतो. अशा राष्ट्रपती कुठल्याही देशाला न मिळो चमचेगिरीचीही मर्यादा असते असं आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटल होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.