अमेरिकेत कोरोना वाढतोय; बायडन म्हणाले, महामारीसाठी तयार राहा

अमेरिकेत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत
joe biden latest news USA
joe biden latest news USA
Updated on
Summary

अमेरिकेत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत.

मागील काही दिवसांपासून अनेक देशांतील कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचे चित्र आहे. यात भारताचाही समावेश आहे. अशा देशातील कमी अधिक प्रमाणात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. दरम्यान, आता भारतानंतर अमेरिकेतही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. (covid 19 patients increased in america)

अमेरिकेत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत १ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आणखी एका महामारीला सामोरं जाण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

joe biden latest news USA
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले..

अमेरिकेत काल ९४ हजार करोना रुग्ण आढळले आहेत. माध्यमांच्या, अहवालानुसार दररोज सरासरी १ लाख रुग्ण आढळत आहेत. ही बाबा चिंताजनक असून प्रशासनाने तेथील नागरिकांना काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने देशातील काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. अमेरिकेत कोरोना रुग्ण वाढत असले तरी कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी आहे. अमेरिकेत दररोज ३५० जणांचा मृत्यू होत आहे. जेव्हा अमेरिकेत ओमिक्रॉनची लाट होती त्यावेळी दररोज २६०० जणांचा मृत्यू होत आहे.

joe biden latest news USA
गिलगीट-बाल्टिस्तानवर चीनचा कब्जा शक्य

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं १३ ते १९ जूनच्या काळात कोरोना संसर्गाचे ३३ लाख रुग्ण आढळले आहेत. तर, जगभरात ७५०० जणांचे मृत्यू झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार ओमिक्रॉन आणि त्याच्या वेरियंटमुळं रुग्ण वाढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.