6 महिने ते 5 वर्षे वयोगटासाठी फायजरच्या लसीची ट्रायल सुरु

Pfizer Corona vaccine
Pfizer Corona vaccinefile photo
Updated on
Summary

सप्टेंबर 2021 पर्यंत 5 ते 11 वर्षांच्या मुलांवर घेण्यात येणाऱ्या ट्रायलचा डेटा उपलब्ध होईल. तसंच त्या महिन्याच्या अखेरीस आपत्कालीन वापराला मंजुली मिळण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरु केली जाईल.

न्यूयॉर्क - कोरोना लस तयार करणारी कंपनी फायजरने 12 वर्षांपेक्षा कमी मुलांवर लशीच्या ट्रायलला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे. कंपनीने मंगळवारी म्हटलं की, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासांठी लशीची ट्रायल सुरु करण्यात येत आहे. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात लहान डोस निवडल्यानंतर 12 वर्षांच्या मुलांवर मोठ्या प्रमाणावर चाचणी घेतली जाणार आहे. या ट्रायलमध्ये जवळपास 4 हजार 500 मुलांची निवड करण्यात आली आहे. अमेरिका, फिनलँड, पोलंड आणि स्पेनमधील ही मुलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षितता, सहनशीलता आणि पहिल्या टप्प्यात 144 मुलांमध्ये निर्माण झालेली इम्युनिटी याच्या आधारे पुढच्या चाचणीची तयारी केली आहे. फायजरने म्हटलं की, 2 ते 11 वर्षे वयाच्या मुलांना 10 मायक्रोग्रॅम डोसची चाचणी होईल. तर 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना 3 मायक्रोग्रॅमचा डोस दिला जाईल. प्रौढांसाठी तयार करण्यात आलेल्या लशीचा डोस हा 30 मायक्रोग्रॅम इतका असतो.

Pfizer Corona vaccine
संक्रमणात मुंबई दुसऱ्या तर पुणे दहाव्या क्रमांकावर

फायजरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सप्टेंबर 2021 पर्यंत 5 ते 11 वर्षांच्या मुलांवर घेण्यात येणाऱ्या ट्रायलचा डेटा उपलब्ध होईल. तसंच त्या महिन्याच्या अखेरीस आपत्कालीन वापराला मंजुली मिळण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरु केली जाईल. याशिवाय 2 ते 5 वर्षांच्या मुलांसाठीचा डेटाही लवकरच मिळू शकतो. 6 महिने ते 2 वर्षे वयोगटातील ट्रायलचा डेटा हा ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या अखेरीस मिळण्याची शक्यता फायजरने व्यक्त केली आहे.

Pfizer Corona vaccine
केंद्राकडून आणखी 44 कोटी डोसची ऑर्डर

फायजरची कोरोना लस 12 वर्षांवरील मुलांना देण्यास याआधीच अमेरिका आणि युरोपियन संघाने मंजुरी दिली आहे. मात्र ही मंजुरी आपत्कालीन वापरासाठी आहे. फायजरने कोरोनाची ही लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत मिळून तयार केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या लशीली सर्वात आधी परवानगी दिली होती. अमेरिकेत जवळपास 7 मिलियन मुलांना किमान लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()