Germany : जर्मनीत पुन्हा मोठ्या संख्येने वाढू लागले कोरोनाचे रुग्ण

जर्मनीत १ लाख ९८ हजार ८८८ नव्याने कोरोनाच्या रुग्णांची नोंदी झाली आहे.
covid-19
covid-19 sakal
Updated on

बर्लिन : जर्मनीत १ लाख ९८ हजार ८८८ नव्याने कोरोनाच्या रुग्णांची नोंदी झाली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा हा आकडा मोठा आहे. चीनमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. जर्मनीच्या राॅबर्ट काॅक संस्थेने (आरकेआय) मंगळवारी (ता.१५) देशात कोरोनाचे १ लाख ९८ हजार ८८८ रुग्णसंख्येची नोंद केली. आठवडाभरापूर्वी हा आकडा ४२ हजारापेक्षा कमी होता. आजच्या रुग्णसंख्येबरोबर महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतची संख्या १.७ कोटी झाली आहे. जर्मनीची (Germany) लोकसंख्या ८.३२ कोटी आहे. (Covid Cases Increases Again In Germany)

covid-19
Russia | रशियाचे १३ हजार ५०० सैनिक मारले गेले, युक्रेनने जाहीर केली आकडेवारी

कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मंगळवारी २८३ लोकांचा मृत्यू झाला असून आता एकूण मृतांचा आकडा १ लाख २५ हजार ८७३ झाली आहे. जर्मनी सरकार एक नवीन कायदा आणून देशातील अगोदरचे निर्बंध कमी करु इच्छित आहे. अस्तित्वात असलेल्या कायद्याची मुदत शनिवारी समाप्त होत आहे. सरकार म्हणते की रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र आरोग्य यंत्रणेवर तिच्या क्षमतेपेक्षा अधिक भार पडण्याचे जोखीम आता राहिलेली नाही.

covid-19
अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध

संसर्गाचे केंद्र असलेल्या भागात निर्बंध लागू करणे आता शक्य होऊ शकेल. मात्र जर्मनीतच कोरोना रुग्णसंख्या वाढते असे नाही. चीनमध्येही मोठ्या संख्येने कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येची नोंद होत आहे. येथील अनेक शहरांमध्येही लाॅकडाऊन लावण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.