अवघ्या चार मिनिटांत मिळणार कोरोना रिपोर्ट; संशोधकांनी विकसित केले उपकरण

यामुळे बाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्यास फायदा होणार आहे.
Corona virus test
Corona virus test Sakal
Updated on

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे होरपळं गेले आहे. यामध्ये अनेकांचे प्रियजन त्यांच्यापासून कायमचे दुरावले. दरम्यान, तुम्हाला कोरोनाची (Corona Test) लागण झाली आहे की नाही हे आरटीपीसीआर (RT-PCR) टेस्ट केल्यानंतरच समजते. मात्र, या टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी साधारण 12 ते 24 तासांचा कालावधी लागतो. परंतु, नव्याने विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमुळे कोरोना टेस्टचा अहवाल केवळ चार मिनिटांमध्ये मिळणार आहे. यामुळे बाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्यास फायदा होणार आहे. (Corona Test New Device)

Corona virus test
विद्यार्थ्यांना मुस्लीम मुलीला घेराव घालायचा नव्हता, कर्नाटकच्या मंत्र्याचं वक्तव्य

नव्याने विकसित करण्यात आलेली प्रणाली चीनने विकसित केली असून, याद्वारे मिळणारा रिझल्ट आरटीपीसीआर टेस्ट इतकेच अचूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत नेचर बायोमेडिकल इंजिनीअरिंग या जर्नलमध्ये लेख प्रकाशित करण्यात आला आहे. नव्याने तयार होणारी ही टेस्टिंग प्रणाली पूर्णपणे विकसित झाल्यानंतर याचा वापर विमानतळ, आरोग्य सुविधा तसेच घरांमध्ये करता येऊ शकतो. जेणे करून कोरोनाचा त्वरित रिझल्ट मिळण्यास मदत होईल. या उपकरणाद्वारे इतर आजारही ओळखता येऊ शकतात, असा दावा संशोधकांनी केला आहे.

Corona virus test
Pushpa: 'इंग्रजी' श्रीवल्लीचा कल्ला: ऐकावं असं व्हर्जन...

शांघायमधील फुडन विद्यापीठातील संशोधकांनी तयार केलेले हे उपकरण, मायक्रोइलेक्ट्रॉनिकसह डीएनएच्या लहान यांत्रिक घटकांचा वापर स्वॅब नमुन्यातील अनुवांशिक मटेरियलचा शोध घेण्यासाठी आणि त्याचे विद्युत सिग्नलमध्ये रूपांतर करण्याचे काम करते. हे उपकरण संगणक किंवा स्मार्टफोनशी कनेक्ट केलेले असते, जेथे टेस्टचे परिणाम दाखवले जातात.

विकसित करण्यात आलेली प्रणाली वेगवान, वापरण्यास सोपी, तसेच अतिशय संवेदनशील आणि पोर्टेबल असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या प्रणालीद्वारे शांघाय येथील कोरोना विषाणूची लागण झालेल्या 33 लोकांचे नमुने घेण्यात आले. तसेच त्याची पीसीआर टेस्टही करण्यात आली. त्या टेस्टचे रिझल्ट देखील पीसीआर चाचणीच्या रिझल्टशी पूर्णपणे जुळल्याचे सांगण्यात आले आहे. स्वॅबमधून अनुवांशिक मटेरियलचे विश्लेषण करण्यासाठी यामध्ये मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सचा वापर करण्यात आला आहे. यामुळे सेन्सर पीसीआर चाचण्यांसाठी कोविड प्रयोगशाळेत लागणारा वेळ कमी होऊ शकतो, असे मत संशोधकांच्या टीमने व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.