Pike County Massacre : 2 वर्षाच्या मुलीला मिळवण्यासाठी अख्या कुटुंबाला संपवलं; 8 जणांचा निर्घृण खून

ओहायो (Ohio) राज्याच्या पश्चिम भागात असलेल्या पाईक काउंटी (Pike County) शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.
Pike County Massacre
Pike County MassacreEsakal
Updated on
Summary

ओहायो (Ohio) राज्याच्या पश्चिम भागात असलेल्या पाईक काउंटी (Pike County) शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.

America Crime News : अमेरिकेतील ओहायो (Ohio) राज्याच्या पश्चिम भागात असलेल्या पाईक काउंटी (Pike County) शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. या शहरात एकूण 24 हजार लोक राहतात. त्यापैकी निम्म्याहून अधिक लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात. 22 एप्रिल 2016 रोजी सकाळी बॉबी आणि जेम्स नावाचे भावंडं त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी घरी पोहोचले. त्यावेळी कार पार्क करून दोघंही घरात प्रवेश करताच त्यांना धक्कादायक चित्र पहायला मिळालं. घरातील सर्वच सदस्यांचे मृतदेह पाहून त्यांना जबर धक्का बसला आणि बॉबीनं लागलीच पोलिसांना फोन केला.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, तिथं तीन घरं असल्याचं दिसलं. बॉबी आणि जेम्स यांनी सांगितलं की, ही तिन्ही घरं त्यांच्या नातेवाईकांची आहेत. या तीन घरांमध्ये त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह पडले आहेत. पोलीस पहिल्यांदा घरात घुसले, तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांनाही धक्काच बसला. याआधी त्यांनी आपल्या आयुष्यात असं गुन्हेगारी दृश्य पाहिलं नव्हतं. 48 वर्षीय ख्रिस्तोफरचा (Christopher) मृतदेह घरात जिवंत अवस्थेत पडला होता. ख्रिस्तोफरवर एकूण 9 गोळ्या झाडण्यात आल्या. 4 गोळ्या डोक्याला, 2 डोळ्याला, 2 हृदयाला आणि एक गोळी पायाला लागली. हल्लेखोरांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी ख्रिस्तोफरनंही आरडाओरडा केल्याचं पोलिसांना आढळलं, पण तो स्वत:ला वाचवू शकला नाही.

गॅरी रॉडेनवर 3 गोळ्या झाडल्या

पोलीस दुसऱ्या खोलीत गेले, तेव्हा त्यांना ४८ वर्षीय गॅरी रॉडेनचा (Gary Rhoden) मृतदेह आढळला. गॅरी हा ख्रिस्तोफरचा चुलत भाऊ होता. झोपेत असतानाच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गॅरीवर एकूण 3 गोळ्या झाडण्यात आल्या. एक गोळी डोक्यावर तर दोन गोळ्या छातीवर लागल्या होत्या. या घरातून पोलिसांना दोनच मृतदेह सापडले.

दुसऱ्या घरात दोन मृतदेह

तपास करत असताना पोलिस शेजारच्या घरात गेले, तेव्हा त्यांना ख्रिस्तोफरची मुलगी हॅना गिली (Hannah Gilley) आणि तिचा मंगेतर फ्रँकी राॅडेन (Frankie Rhoden) यांचे मृतदेह आढळले. दोघंही एकाच बेडवर झोपले होते. झोपेत असताना दोघांनाही गोळ्या झाडल्या. मात्र, त्यांचा 4 महिन्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत झोपला होता. त्याला हल्लेखोरांनी सोडून दिलं होतं. त्याच्यावर गोळी झाडली नाही. फ्रँकीच्या डोक्यात तीन गोळ्या लागल्याचं पोलिसांना आढळून आलं. तर, हॅना गिलीच्या डोक्यात आणि डोळ्यात तीन गोळ्या झाडण्यात आल्या.

Pike County Massacre
Pratapgad : अफजल खान मुस्लिम होता म्हणून..; सरकारचं कौतुक करत उदयनराजेंनी दिली स्पष्ट प्रतिक्रिया

तिसऱ्या घरात तीन मृतदेह

जेव्हा पोलिस तिसऱ्या घरात पोहोचले, तेव्हा त्यांना हॅना राॅडेन (Hannah Rhoden) आणि ख्रिस ज्युनियरचे (Chris Junior) मृतदेह आढळले. हॅना रॉडेन ही ख्रिस्तोफरची दुसरी मुलगी होती. तर, ख्रिस त्याचा एकमेव नातेवाईक होता. हॅना राॅडेन तिची सावत्र आई डाना सोबत इथं राहत होती. याच घरात डानाचा (Dana Rhoden) मृतदेहही सापडला होता. डाना यांच्यावर एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी 4 तोंडावर आणि एक छातीवर झाडली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हॅना रॉडेननं 4 दिवसांपूर्वीच दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. इथंही हल्लेखोरांनी मुलाला जिवंत सोडलं होतं. तर, हॅना राॅडेननं तिची 2 वर्षांची मुलगी सोफियाला (Sophia) काही दिवस ख्रिस्तोफरकडं राहण्यासाठी सोडलं. पण, हल्लेखोरांनी सोफियालाही काही केलं नाही.

पोलिसांना 8 वा मृतदेह सापडला

'न्यूयॉर्क पोस्ट'नुसार, आतापर्यंत पोलिसांना एकूण 7 मृतदेह सापडले होते. घटनास्थळी उपस्थित असलेले बॉबी आणि जेम्स यांनाही धक्का बसला. कारण, त्यांच्या कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यांनी आणखी एका चुलत भावाचा विचार केला, ज्याचं नाव केनेथ राॅडेन (Kenneth Rhoden) होते. तो काही किलोमीटर अंतरावर राहत होता. दोघांनी केनेथला फोन करून सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. पण, केनेथनं फोन उचलला नाही. मग, केनेथ फोन का उचलत नाही या विचारानं बॉबी आणि जेम्स तणावात पडले. त्यांनी लगेच पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलीस ताबडतोब केनेथच्या घरी पोहोचले आणि तोही तिथं मृतावस्थेत पडलेला दिसला. त्याच्या डोक्यात चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

सर्वांचे मोबाईल गायब

पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र त्यांना काहीच सुगावा लागला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना गोळ्यांचा आवाज ऐकला का असं विचारलं. त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना काहीही ऐकू आलं नाही आणि त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. पोलिसांना समजलं की कुटुंबाकडं दोन पिटबुल कुत्रे देखील आहेत. ज्यांना प्रत्येकजण घाबरत होता. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, तेथून मृतांचे मोबाईलही गायब असल्याचं दिसलं.

ड्रग माफियांचा संशय

बघता बघता हे प्रकरण शहरभर पसरलं. मात्र, सर्व प्रयत्न करूनही पोलिसांना कोणताही पुरावा सापडला नाही. पोलीस अस्वस्थ झाले. त्यानंतर त्यांनी तपासाचा कोन बदलला. पोलिसांनी कुटुंबाचा इतिहास शोधण्यास सुरुवात केली. ख्रिस्तोफर आणि केनेथ हे ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना याची माहिती मिळताच 'द कॉर्नब्रेड माफिया'वर थेट संशय आला. जो मेक्सिकन ड्रग माफिया आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारावरून दोन्ही भावांची ड्रग्ज माफियांशी भांडणं झाली असावी, असं पोलिसांना वाटत होतं आणि त्यामुळंच ड्रग्ज माफियांनी या सगळ्यांची हत्या केली असावी.

Pike County Massacre
मतांच्या लालसेपोटीच उद्धव ठाकरेंनी अफजल खान कबरीजवळच्या अतिक्रमणाला संरक्षण दिलं; बावनकुळेंचा गंभीर आरोप

दरम्यान, पोलिसांनी लोकांचे फोन उचलणं बंद केलं. ख्रिस्तोफरचा बिली वॅगनर (Billy Wagner) हा मित्र असल्याचंही पोलिसांना यावेळी समजलं. तो कुटुंबासोबत त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहत होता. 2010 मध्ये बिलीचा मुलगा जॅक वॅगनर (Jake Wagner) आणि हॅना रॉडेन यांचं अफेअर होतं. दोघांचं अफेअर 2015 पर्यंत चाललं. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी या कुटुंबाचीही चौकशी केली. मात्र, या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचा या कुटुंबीयांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. पण, आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा ख्रिस्तोफर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली, त्यानंतर केवळ 4 दिवसांनी जॅकनं कोर्टात अर्ज दाखल करून सोफियाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानं कोर्टाला एक पत्रही दाखवलं ज्यात हॅना राॅडेननं लिहिलं होतं की, मला काही झालं तर माझ्या मुलीचा ताबा तिचे वडील जॅक यांच्याकडं देण्यात यावा. मात्र, न्यायालयानं त्याला सोफियाचा ताबा दिला नाही.

बिलीचं कुटुंब एक वर्ष अलास्कामध्ये राहत होतं

यानंतर संपूर्ण कुटुंब पाईक काउंटीमधून अलास्का इथं शिफ्ट झालं. पण, वर्षभरानंतर हे लोक पाईकमध्ये परत आले. यावेळी तो परत आला, तेव्हा जॅकची दुसरी पत्नी त्याच्यासोबत होती. वास्तविक, जॅकचं लग्न अलास्कामध्ये झालं. आता हे कुटुंब पाईक काउंटीमध्ये राहत होतं. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. 8 खूनांचाही सर्वांना विसर पडला होता.

Pike County Massacre
Kolhapur : मिरवणूक काढत आणलेली 21 लाखांची दुचाकी जळून खाक; डोळ्यांसमोर स्वप्न उद्ध्वस्त!

दोन्ही सूना थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्या

दरम्यान, बिली आणि त्याची पत्नी अँजेला यांच्यात मतभेद सुरू झाले आणि तिनं बिलीला घटस्फोट दिला. मग, जवळच दोन खोल्यांचं घर भाड्यानं घेऊन ती तिथं राहू लागली. या सर्व गोष्टी जॅकच्या नववधूला अगदी विचित्र वाटत होत्या. काही दिवसांनी जॅकचा भाऊ जॉर्ज वॅगनर (George Wagner) याचंही लग्न होतं. घरच्यांनीही बायकोला ताब्यात ठेवलं होतं. दोन्ही सुनांना ही गोष्ट इतकी विचित्र वाटली की, त्या पोलिसांपर्यंत पोहोचल्या. या 8 हत्यांशी या कुटुंबाचा कुठेतरी संबंध आहे, असं दोन्ही सुनांच्या बोलण्यावरून पोलिसांना वाटलं.

असा प्रकार उघडकीस झाला

त्यानंतर पोलिसांनी बिली आणि त्याच्या कुटुंबीयांना पकडलं आणि त्यांची कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर त्यांनी या हत्येची कबुली दिली. बिली, जॅक आणि जॉर्ज यांनी सांगितलं की, त्यांनी या 8 लोकांना मारलं आहे. जॅक आणि हॅना रॉडेन जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा दोघंही बिलीच्या घरी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 2015 मध्ये एके दिवशी हॅनानं ख्रिस्तोफरला कॉल केला आणि सांगितलं की, जॅक आणि त्याचं कुटुंब तिला नियंत्रणात ठेवतं. कुणाला बोलूही देत ​​नाही. एकदा जॅकनं तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. ख्रिस्तोफर थेट जॅकच्या घरी गेला आणि तिथून हॅनाला सोबत घेऊन गेला. जॅक आणि हॅना यांना एक मुलगी होती. सोफिया, जी त्यावेळी 1 वर्षांची होती. सोफियालाही त्यानं सोबत घेतलं.

Pike County Massacre
World Population : लोकसंख्या वाढीत भारत चीनला मागं टाकणार; 2023 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला बनणार देश!

हॅना रॉडेनचं फेसबुकवर चॅटिंग

घरी आल्यावर हॅना नेहमी फेसबुकवर मित्रांशी गप्पा मारायची आणि त्यांना जॅकबद्दल सांगायची. त्याच वेळी, तिनं तिच्या अनेक मित्रांना सांगितलं की माझी मुलगी सोफियाचा ताबा कोणत्याही परिस्थितीत जॅकला देणार नाही. पण, जॅकसोबत तिचं फेसबुक अकाउंटही उघडलं होतं हे ती विसरली होती. हॅनाचे सगळे चॅट जॅक वाचायचा. हे तिला कळून चुकलं होतं.

बिली कुटुंबानं आखला हत्येचा कट

जॅकनं सर्व बाबी वडिलांना सांगितल्या. त्यानंतर 2015 च्या शेवटी बिलीनं संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसवून सोफियाचा ताबा कसा मिळवायचा यावर चर्चा केली. कुटुंबानं निर्णय घेतला की, हॅनाचं संपूर्ण कुटुंब नष्ट केलं पाहिजे. जेणेकरून त्यांना स्वतःहून सोफियाचा ताबा मिळेल. मग, या लोकांनी हत्येचं अचूक नियोजन केलं. बिली वॅगनरनं कुटुंबासाठी त्यांच्या आकारापेक्षा मोठे दोन शूज खरेदी केले. खुनाच्या ठिकाणी आमच्या पावलांचे ठसे मिळाले तरी पोलिसांना त्या बुटांच्या आकाराची व्यक्ती सापडेल, असं त्यांना वाटलं. त्यानंतर त्यानं बंदुकीच्या दुकानातून तीन पिस्तुले खरेदी केली होती. बिली वॅगनरनं हत्येपूर्वी घराच्या मागं फायरिंग रेंज बांधली होती. दोघं भाऊ आणि बिली वॅगनर इथं रात्रंदिवस गोळीबाराचा सराव करत असतं. हा सराव तीन महिने चालला. खून करण्याच्या एक दिवस आधी त्यानं केसांना तात्पुरता रंगही लावला होता. जेणेकरून त्याची ओळख पटू शकणार नाही.

Pike County Massacre
राष्ट्रवादीत लवकरच फाटाफुट, खासदार-आमदार भाजपात प्रवेश करणार; बालेकिल्ल्यात बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट

नियोजनानुसार, 21 एप्रिल 2016 रोजी बिली वॅगनर रात्री आदल्या दिवशी ख्रिस्तोफरच्या घरी गेला. कुत्रे बांधलेले पाहून तो थेट घरात गेला. तिथं ख्रिस्तोफर टीव्ही पाहत होता. त्यानंतर दोन्ही भावांनी घरात घुसून एक-एक करून सर्व 7 जणांची हत्या केली. मग, जॅकला आठवलं की त्याचा आणखी एक नातेवाईक केनेथ होता. त्यानंतर दोघे भाऊ केनेथच्या घरी गेले आणि त्याचीही हत्या केली.

जॅकला 8 वेळा झाली जन्मठेपेची शिक्षा

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी बिली, त्याची दोन मुलं जॅक आणि जॉर्ज, त्याची पत्नी अँजेला यांना अटक केली. आरोपींना पकडून थेट न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यांची सुनावणी सुरू झाली. दरम्यान, कोविडमुळं खटला थोडा लांबला. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, या प्रकरणात आतापर्यंत जॅकला 8 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो पॅरोलवरही बाहेर येऊ शकत नाही. त्याच्या आईचाही या हत्येत सहभाग असल्यानं तिला 30 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचवेळी बिली आणि जॉर्ज यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे. त्यांना अद्याप शिक्षा झालेली नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()