Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळाचा पाकिस्तानला मोठा फटका: ३४ जणांचा मृत्यू

बिपरजॉय चक्रीवादळाने रुद्र अवतार धारण केले आहे.
Cyclone Biparjoy Update pakistan 34 people died rain weather
Cyclone Biparjoy Update pakistan 34 people died rain weather
Updated on

बिपरजॉय चक्रीवादाळातील वाऱ्याचा वेग ताशी १७५ किलोमीटरहून अधिक आहे. त्यामुळे बिपरजॉय चक्रीवादळाने रुद्र अवतार धारण केले आहे. तर या वादळाचा फटका पाकिस्तानला बसला आहे. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 34 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 145 जण वादळाच्या तडाख्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. (Cyclone Biparjoy Update pakistan 34 people died rain weather )

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने पाकिस्तानात कहर केला. त्यामुळे 34 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 80 घरांचेही नुकसान झाले आहे. खैबर पख्तूनख्वाच्या बन्नू, डेरा इस्माईल खान, करक आणि लक्की मारवत येथे मोठे नुकसान झाल्याची माहिती पाकिस्तान प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. Weather Updates

Cyclone Biparjoy Update pakistan 34 people died rain weather
Weather Update: उसळलेल्या तुफानी लाटांनी मुंबईकरांना भरली धडकी; राज्याला यलो अलर्ट जाहीर

कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी खैबर पख्तूनख्वामधील सर्व 1122 केंद्रांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू असून सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे.Weather Updates

प्रशासनाने या दुर्घटनेत पुनर्वसन आणि मदत कार्यांसाठी 40 दशलक्ष रुपये जारी केले आहेत. वादळाच्या तीव्रतेने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Cyclone Biparjoy Update pakistan 34 people died rain weather
Weather Update: मान्सून केरळमध्ये तर महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार?

यात बिपरजॉय अक्षांश 17.4N आणि लांब 67.3E, मुंबईपासून सुमारे 600 किमी अंतरावर आहे. तर पोरबंदरच्या 530 किमी अंतरावर हे चक्रीवादळ आहे. तसेच कराचीपासून 830 किमी अंतरावर केंद्रीत होत आहे. 15 जून रोजी वादळ दुपारच्या सुमारास पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीजवळ पोहचणार आहे.Weather Updates

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.