China : केंद्रीय समितीतून माजी मंत्र्यांना डच्चू ;चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय

चिनी कम्युनिस्ट पक्षाने अंतर्गत फेररचनेला सुरुवात केली असून माजी परराष्ट्रमंत्री क्विन गँग यांची केंद्रीय समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
China
China sakal
Updated on

बिजिंग : चिनी कम्युनिस्ट पक्षाने अंतर्गत फेररचनेला सुरुवात केली असून माजी परराष्ट्रमंत्री क्विन गँग यांची केंद्रीय समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी संरक्षणमंत्री ली शांग्फू आणि अन्य दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरही मोहोर उमटविण्यात आली आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. भ्रष्ट नेते आणि अधिकारी हे सध्य पक्षाच्या रडारवर आहेत.

जिनपिंग यांच्या पुढाकाराने मोहीम

चिनी लष्करातील भ्रष्टाचाराचा निपटारा करण्यासाठी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मोठी मोहीम सुरू केली असून त्यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. स्वतः जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सरचिटणीस आहेत. जिनपिंग यांनी २०१२ मध्ये चीनची सत्ता हातात घेतल्यानंतर लष्करातील पन्नास बड्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे अन्य एक वरिष्ठ अधिकारी सन जिनमिंग यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर देखील भ्रष्टाचार आणि बेशिस्तीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या केंद्रीय समितीची बैठक गुरुवारी संपली. या बैठकीमध्येच हा निर्णय घेण्यात आला. चीनच्या आर्थिक वाटचालीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्किन (वय ५८) हे २०२३ मध्ये अचानक सार्वजनिक जीवनातून गायब झाले होते. चीनच्या इतिहासामध्ये परराष्ट्रमंत्रिपदी सर्वांत कमी काळ राहिलेले मंत्री ते ठरले होते. दरम्यान त्यांच्या हकालपट्टीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.

क्विन यांची उपाधी कायम

केंद्रीय समितीने क्विन यांची हकालपट्टी केली असली तरीसुद्धा त्यांची ‘कॉम्रेड’ ही उपाधी कायम ठेवण्यात आली आहे. क्विन यांच्या जागी वांग यी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते देखील पॉलिटब्यूरोचे सदस्य आहेत. ली शांग्फू यांनी देशाच्या रॉकेट फोर्सचे प्रमुख म्हणून काम केले असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणामध्ये खटला भरण्यात आला होता. ली युचाओ हे देखील रॉकेट फोर्सचा भाग होते पण ली शांग्फू यांच्यासह त्यांची देखील हकालपट्टी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.