भारतासाठी धोक्याची घंटा; चीन तिबेटमध्ये उभारणार जगातील सर्वांत मोठं धरण

China_Dam
China_Dam
Updated on

बीजिंग : शेजारील राष्ट्र असणाऱ्या चीनच्या कुरापती अख्ख्या जगाला माहीत आहेत. सतत शेजारील राष्ट्रांशी कोणत्या ना कोणत्या कारणांवरून भांडण उकरून काढणं हा चीनचा स्वभाव. आताही त्यानं आपल्या अशाच कुरापतीमुळं भारताच्या डोक्याचं दुखणं वाढवलं आहे. चीन आता तिबेटमध्ये एक मोठं धरण बांधण्याच्या विचारात आहे. याद्वारे चीनचं वीज उत्पादन तिपटीने वाढणार आहे. जगातील सर्वात मोठे पॉवर स्टेशन असलेल्या थ्री जॉर्जेसची हा मेगा प्रोजेक्ट मागे टाकणार आहे, त्यामुळे पर्यावरणवाद्यांसह भारतासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

हिमालयातून निघाल्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी भारतात प्रवेश करण्यापूर्वी यू-टर्न घेते. त्या भागात १५०० मीटर खोल खंदक बनला आहे. आणि त्याच ठिकाणी चीन आता हा मेगा प्रोजेक्ट उभारणार आहे. चीनने याआधी उभारलेली तीन मोठी धरणे या मेगा प्रोजेक्टपुढे किरकोळ ठरणार आहेत. तिबेटमधील यारलुंग त्सांगपो या नदीवर दोन मोठे प्रकल्प आहेत, तर आणखी सहा प्रकल्प निर्माणाधीन आहेत. 

तिबेटच्या मॅडोग काउंटी भागात हा प्रस्तावित प्रकल्प आहे. मध्य चीनमधील यांगत्से नदीवरील थ्री जॉर्जेस पेक्षा हा मोठा प्रकल्प आहे. दरवर्षी सुमारे ३०० अब्ज किलोवॅट वीज निर्मिती याठिकाणी करण्यात येणार आहे. या मेगा प्रोजेक्टचा उल्लेख चीनच्या १४व्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आला असून मार्च महिन्यात त्याला खासदारांनी मंजूरी दिली आहे. 

तिबेटमध्ये उगम झाल्यापासून ब्रह्मपुत्रा नदी २९०० किमीचा प्रवास करत भारत आणि बांगलादेशमधून बंगालच्या उपसागराला मिळते. तिबेटमध्ये ती यारलुंग त्यांगपो म्हणून ओळखले जाते.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.