गेल्या महिन्यात झालेल्या संसदीय निवडणुकीच्या अंतिम निकालांची पुष्टी करण्यासाठी जॉर्जियाच्या निवडणूक आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विरोधी पक्षाचे अधिकाऱ्यांवर रंग टाकण्यात आला आहे. यामुळे वातावरण तापलं होतं. तिबिलिसी येथे जॉर्जियाच्या निवडणूक मंडळाच्या बैठकीत विरोधी पक्षाचे अधिकारी डेव्हिड किर्तडझे यांनी ज्योर्गी कलंदरिशविली यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.