मुंबई : अधोविश्वातील कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम (gangster dawood ibrahim) व छोटा शकील (chota shakeel) यांचा विश्वासू फहीम मचमच (Fahim machmach death) याला कोरोनामुळे पाकिस्तानात (Pakistan) शुक्रवारी मृत्यू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. फहिम मचमच याचा मृत्यू पाकिस्तानातील कराचीमध्ये (karachi) झाला असून डी कंपनीकडून (D-company) मात्र भारतीय यंत्रणांच्या भीतीने त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
फहीम मचमचा मृत्यू दक्षिण आफ्रिकेत हृदयविकारामुळे झाल्याच्या वावड्या डी कंपनीकडून उडवण्यात येत आहेत. पण मचमचचा मृत्यू कराचीत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. फहीम मचमच याच्याविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकावणे असे अनेक गंभीर गुन्हे भारतात आहेत. पुतण्या मोहम्मद रिझवान इक्बाल हसन शेख इब्राहिम याला अटक झाल्यानंतर 2019 मध्ये दाऊद इब्राहिम व छोटा शकील यांनी फहिम मचमचला सज्जड दम दिला होता. तेव्हापासून त्याने भारतात दूरध्वनीद्वारे संपर्क करणे फार कमी केले होते. त्यापूर्वी दाऊद व छोटा शकील भारतीय यंत्रणांच्या रडारवर आल्यामुळे फहीम मचमच हाच मुंबईतील व्यवहारावर लक्ष ठेऊन होता. तो दाऊद व शकीलचा अत्यंत विश्वासू होता. मुंबईतील गुन्हे शाखेचे अधिकारीही या दाव्याची पडताळणी करत आहेत.
डी' कंपनीत दाऊद, छोटा शकिलनंतर छोटा राजनचं स्थान होतं, माञ राजनने डी कंपनी सोडल्यानंतर फहिमने त्याची जागा घेतली.फहीम मचमच मुंबईतील प्राँपर्टी रिडेव्हलपर असलेल्या फहिमचे नाव नाव 2003 मध्ये सर्व प्रथम प्रसिद्धी झोतात आले. फहिम मचमचने एका विकासकाकडून जबरदस्ती पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. दाऊदसाठी हप्ते वसूली करणारा फहिम हा प्रचंड बडबड्या होता. त्यामुळेच त्याला मचमच हे टोपण नाव पडलं.फहिम मचमचवर मुंबईत शेकडो धमकीचे गुन्हे दाखल आहेत. फहिम हा डी कंपनीसाठी शार्प शूटरची भरती करतो. सूञांनी दिलेल्या माहितीनुसार फहिमने काही वर्षांपासून यूपी, रत्नागिरी, मध्यप्रदेश, कुर्ला, गोवंडी, साकीनाका, पंजाब, राजस्थान या राज्यातून 2018मध्ये तरुणांची भरती डी कंपनीत केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.