Dawood Ibrahim : 'दाऊद इब्राहिम'बाबत मुंबई पोलिसांकडे मोठी अपडेट?, उपचारांच्या वृत्ताला दुजोरा

भारतातील अनेक बॉम्बस्फोटांमध्ये हात असलेला दहशतवादी दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे...
Dawood Ibrahim
Dawood Ibrahimesakal
Updated on

मुंबईः भारतातील अनेक बॉम्बस्फोटांमध्ये हात असलेला दहशतवादी दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे रविवारपासून दाऊद ट्रेंडिंगमध्ये आहे.

यामगचं सत्य स्पष्ट होत नसलं तरी मुंबई पोलिसांच्या सूत्रानुसार दाऊद रुग्णालयात दाखल होता, अशी माहिती येतेय. दाऊदवर एकतर विषप्रयोग झाला किंवा त्याच्यावर हल्ला झाला, असं सांगितलं जात आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्राचं वृत्त 'एबीपी माझा'ने दिलं आहे.

सांगितलं जातंय की, दाऊदला मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. पाकिस्तानी माध्यमं त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचं सांगत आहेत. याबाबत अधिकृत कुठलीही माहिती समोर आलेली आहे.

Dawood Ibrahim
तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री नाही तर देशाचे पंतप्रधान आहात; उद्धव ठाकरेंनी मोदींना सुनावलं

अर्थात पाकिस्तानने दाऊदला आसरा दिल्याची कबुली कधीच दिलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानकडून सत्यतेची अपेक्षा नाही. दुसरीकडे भारतानेही याबाबत अधिकृत कोणतीच माहिती दिलेली नाहीये. मात्र मुंबई पोलिसांकडून दाऊदच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आल्याचं वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं.

दरम्यान, सोशल मीडियावर रविवारी रात्री #DawoodIbrahim #karachi हे hashtag ट्रेंडिगमध्ये होते. काही युजर्स असा दावा करत आहेत, की दाऊद इब्राहिमवर अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केला आणि दाऊदवर सध्या कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dawood Ibrahim
...म्हणून मला त्या लग्नाला जावं लागलं; गिरीश महाजन यांचे 'दाऊद' संबंधाच्या आरोपावर उत्तर

पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री बऱ्याचशा शहरांमधील इंटरनेट डाऊन झाले. डाऊन डिटेक्टरवरील माहितीनुसार संध्याकाळी ७ नंतर कराची, लाहोर, रावळपिंडी येथील इंटरनेट डाऊन झाले. पाकिस्तानात इंटरनेट डाऊन होण्यामागे राजकीय कारण असल्याचंही सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.