Dawood Ibrahim: भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद रुग्णालयात? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

सोशल मीडियावर रात्री #DawoodIbrahim #karachi हे hashtag ट्रेंड होत आहेत. सोशल मीडियावर काही युजर्स असा दावा करत आहे की दाऊद इब्राहिमवर अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केला आणि त्याच्यावर सध्या कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Dawood Ibrahim Poisoning
Dawood Ibrahim Poisoningesakal
Updated on

Dawood Ibrahim Poisoning Rumors

भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आहे. X (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #dawoodibrahim ट्रेंड होत आहे. दाऊदच्या प्रकृतीबाबत चर्चेला उधाण आले असून पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद पडल्याने चर्चेत भर पडली आहे. दाऊदसंदर्भात सरकारी यंत्रणाकडून अद्याप दुजोरा किंवा प्रतिक्रिया आलेली नाही.

सोशल मीडियावर रविवारी रात्री #DawoodIbrahim #karachi हे hashtag ट्रेंडिगमध्ये आले. सोशल मीडियावर काही युजर्स असा दावा करत आहे की दाऊद इब्राहिमवर अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केला आणि दाऊदवर सध्या कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उजव्या विचारधारेच्या युजर्सनी पाकिस्तानातून मोठी बातमी अशा आशयाची पोस्ट केल्याने चर्चेला जोर आला. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर, दिल्लीतील काही पत्रकारांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट टाकल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. रात्री उशिरापर्यंत पाकिस्तानातील माध्यमे, सरकारी यंत्रणा यांच्याकडून या वृत्ताबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.

खोटे स्क्रीनशॉट व्हायरल (Dawood Ibrahim Fact Check)

काही युजर्सनी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी X वर पोस्ट केल्याचे स्क्रीनशॉट देखील व्हायरल केले. मात्र, काकर यांच्या X account वर गेल्या 24 तासात एकही पोस्ट टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे हे स्क्रीनशॉट खोटे असल्याचे स्पष्ट झाले.

Fact Check
Fact CheckPakistan PM X Account
Dawood Ibrahim Poisoning
Dawood Ibrahim : दुसरं लग्न करुन दाऊद...; हसीना पारकरच्या मुलाने उलगडलं मुंबई कनेक्शन

इंटरनेट सेवा बंद Internet Shut Down in Pakistan:

पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री बऱ्याचशा शहरांमधील इंटरनेट डाऊन झाले. डाऊन डिटेक्टरवरील माहितीनुसार संध्याकाळी ७ नंतर कराची, लाहोर, रावळपिंडी येथील इंटरनेट डाऊन झाले. यामागे दाऊद इब्राहिम हे कारण असल्याची शक्यता भारतीय युजर्स वर्तवत आहेत. मात्र, पाकिस्तानात इंटरनेट डाऊन होण्यामागे राजकीय कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ऑनलाईन रॅलीमुळे सरकारने इंटरनेट बद केल्याचे आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षातर्फे केला जात आहे.

भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप दाऊद इब्राहिमबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सध्या तरी सोशल मीडियावर चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()