Libya Flood Update : लीबियामध्ये महापूर! मृतांची संख्या सहा हजारांवर, 30 हजारांहून अधिक बेपत्ता

Libya : लीबियामध्ये सोमवारी आलेल्या महापुरामुळे कित्येक किनारी शहरं उद्ध्वस्त झाली आहेत.
Libya Flood Update
Libya Flood UpdateeSakal
Updated on

लीबियामध्ये सोमवारी आलेल्या महापुरामुळे कित्येक किनारी शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. या पुरामध्ये आतापर्यंत तब्बल सहा हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. लीबियामधील संयुक्त सरकारचे आरोग्य सहाय्यक सचिव सादेद्दीन अब्दुल वाकिल यांनी याबाबत माहिती दिली.

भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळामुळे लीबियामध्ये महापूर आला आहे. किनारी भागात असलेल्या एकट्या डेर्ना शहरातच 30 हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने म्हटलं आहे.

Libya Flood Update
Nipah Virus: केरळमधील मृत्यूमागे निपाह व्हायरस! जाणून घ्या हा व्हायरस किती धोकादायक आहे? शरीराला कशी हानी पोहोचते?

शहरात जाणंही अवघड

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, किनारी भागातील शहरं एवढी उद्ध्वस्त झाली आहेत, की त्याठिकाणी जाणंही अवघड होत आहे. डेर्ना शहरातील सात एंट्री पॉइंटमधील केवळ दोनच सध्या सुरू झाले आहेत. अधिकारी शहरांमधील मलबा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नागरिक समुद्रात वाहून गेल्याची भीती

दहा हजारांहून अधिक नागरिक मलब्याखाली दबले गेले असावेत, आणि तेवढेच लोक समुद्रात वाहून गेले असण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. किनारी भागांतील शहरांमध्ये सुमारे एक लाख लोक राहत होते, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Libya Flood Update
Top 10 World Earthquake : सेकंदात लाखो जीव गमावले, इमारती कोसळल्या… हे आहेत जगातील 10 विनाशकारी भूकंप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.