Corona: एका महिन्यात कोरोना मृत्यूंमध्ये 35 टक्क्यांनी वाढ, WHO प्रमुखांनी दिला इशारा

कोविड-19 विषाणू संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे
Tedros Adhanom Ghebreyesus
Tedros Adhanom Ghebreyesusesakal
Updated on

कोरोना अजून संपलेला नाही. गेल्या चार आठवड्यात जगभरात या साथीच्या आजारामुळे मृत्यू होण्याच्या संख्येत 35 टक्क्यांची चिंताजनक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉक्टर टेड्रोस गेब्रेयसस यांनी पुन्हा एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करून जगभरातील लोकांना इशारा दिला आहे.

हे सलग तिसरे वर्ष आहे की, कोविड-19 विषाणू संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना महामारीबद्दल तज्ज्ञ आणि डॉक्टर वारंवार सांगत आहेत की, कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे. यावर टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले की रोग संपला आहे असे समजू नये. यापासून स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी आपण नेहमी साधनांनी सज्ज असले पाहिजे. गेब्रेयसस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही सर्वजण कोरोना विषाणू आणि महामारीने कंटाळलो आहोत, पण हा विषाणू अजून थकलेला नाही.'

कोरोनाचे ओमिक्रॉन हा प्रकार सध्या बाळवलेला आहे. गेल्या एका महिन्यात, 90 टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये BA.5 सब-स्ट्रेन आढळून आला आहे. आपल्या पोस्टमध्ये डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले- 'एक चार आठवड्यात कोविडमुळे 15,000 लोकांनी आपला जीव गमावला. हा आकडा असह्य आहे, कारण संसर्ग टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आपल्याकडे सर्व संसाधने आहेत.आपल्यापैकी कोणीही लाचार नाही. प्रत्येकाने लसीकरण करून घ्या आणि आवश्यक असल्यास बूस्टर (डोस) घ्या. मास्क घाला आणि सुरक्षित शारीरिक अंतर ठेवा असेही ते म्हणालेत.

आतापर्यंत 59 कोटी लोकांना संसर्ग झाला आहे

कोरोना महामारीमुळे आतापर्यंत जगभरात 59 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या कालावधीत 64 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत 93 दशलक्षाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. भारतात सुमारे 44 दशलक्ष लोकांना संसर्ग झाला आहे.

बूस्टर डोससह सर्व खबरदारी आवश्यक: डॉ पाल

दरम्यान, डॉ. व्ही. के पॉल , सदस्य आरोग्य, NITI आयोग ऑफ इंडिया यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारी अजूनही अस्तित्वात आहे. हे गेल्या काही आठवड्यांत वाढत आहे, त्यामुळे लसीच्या बूस्टर डोससह सर्व आवश्यक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये मास्क आणि सुरक्षित शारीरिक अंतर यांचाही समावेश आहे. आर्कोबेवॅक्स लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात सक्रिय रुग्ण आणि संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 12,608 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 16,251 रुग्ण बरे झाले आहेत. आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,01,343 वर आली आहे. त्याच वेळी, दैनिक संसर्ग दर 3.48 वर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.