Indigo Flight : 'इंडिगो'त प्रवाशाचा मृत्यू; पाकिस्तानात भारतीय विमानाचं Emergency लँडिंग

दिल्ली-दोहा इंडिगो विमानात (Delhi-Doha Indigo Flight) हृदय पिळवटून टाकणारं प्रकरण समोर आलंय.
Madurai-Delhi Indigo Flight
Madurai-Delhi Indigo Flightesakal
Updated on
Summary

इंडिगो विमानाच्या वैमानिकानं पाकिस्तानकडं वैद्यकीय आणीबाणीमुळं आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती.

नवी दिल्ली : दिल्ली-दोहा इंडिगो विमानात (Delhi-Doha Indigo Flight) हृदय पिळवटून टाकणारं प्रकरण समोर आलंय. एक प्रवासी आजारी पडल्यामुळं इंडिगो एअरलाइनच्या विमानाचं पाकिस्तानतील कराची विमानतळावर (Karachi Airport) आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

इंडिगो एअरलाइन्सनं सांगितलं की, विमानतळावर वैद्यकीय पथकानं प्रवाशाला मृत घोषित केलं. हा प्रवासी नायजेरियन नागरिक (Nigerian Citizen) आहे.

इंडिगो फ्लाइटमध्ये (6E-1736) एका प्रवाशाला विमानात मध्यभागी अस्वस्थ वाटू लागलं होतं. यानंतर फ्लाइटच्या पायलटनं कराची एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली.

कराचीमधील नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या प्रवक्त्यानं पुष्टी केली की, 'भारतीय विमान कंपनीचं विमान दिल्लीहून दुबईला जात असताना उड्डाणाच्या मध्यभागी एक प्रवासी आजारी पडला.'

Madurai-Delhi Indigo Flight
Narendra Modi : काँग्रेस नेते माझी कबर खोदण्याची स्वप्नं पाहताहेत आणि मी..; PM मोदींचा जोरदार हल्लाबोल

त्यानंतर इंडिगो विमानाच्या वैमानिकानं वैद्यकीय आणीबाणीमुळं आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती, जी कराची विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रकानं मंजूर केली.

अब्दुल्ला (वय 60) असं प्रवाशाचं नाव असून तो नायजेरियन नागरिक आहे. मात्र, विमान उतरण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. CAA आणि NIH च्या डॉक्टरांनी प्रवाशाचं मृत्यू प्रमाणपत्र जारी केलंय. दरम्यान, इंडिगो एअरलाइननं शोक व्यक्त केला आहे.

Madurai-Delhi Indigo Flight
Politics : गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला अन् महाराष्ट्रावर मोठं संकट आलं; भाजप आमदाराचा जोरदार प्रहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.