Tik Tok Ban : जगभरात टिकटॉक ॲपवर बंदी? अमेरिकेतल्या नेत्याने केली मागणी

अनेक देशांत सुरक्षेच्या दृष्टीने टिकटॉक ॲप घातक असल्याचं म्हटलं जातंय, तज्ज्ञांनीही याबाबत चिंता व्यक्त केलीय
Tik Tok Ban in america
Tik Tok Ban in america esakal
Updated on

शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म म्हणून जगभऱ्यात ओळखल्या जाणाऱ्या Tik Tok ॲपच्या बंदीची मागणी जगभरातून होऊ लागली आहे. भारतात या ॲपवर आधीच बंदी घालण्यात आली आहे. आता अमेरिकेतही टिकटॉक ॲप बंदीची मोठ्या प्रमाणात मागणी सुरू आहे. यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (USFCC) च्या एका नेत्याने Apple आणि Google ला डेटा सुरक्षेचा विचार करता ॲप स्टोअरमधून टिकटॉकचे ॲप काढून टाकण्यास सांगितले आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केलीय चिंता

याधीही टिकटॉक संबंधित काही महत्वाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. टिकटॉक बाबत टेक क्षेत्रातील अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या ॲपचे जगभऱ्यात तब्बल १ अब्जाहून अधिक युजर्स आहेत. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी टिकटॉकबाबत उघड वक्तव्य केलं होतं. टिकटॉकमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा दावा मार्कने केला होता. तसेच जगभरातील अनेक तज्ज्ञांनी या ॲपबाबत तक्रारही केली होती.

Tik Tok Ban in america
सरकारकडून Tik Tok अॅपवर बंदी आणण्याचे आदेश

टिक टॉकची मालकी चीनी कंपनी ByteDance कडे

अमेरिकेत लोकप्रिय होत असलेल्या टिकटॉकची मालकी चीनी कंपनी ByteDance कडे आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना या कंपनीला अमेरिकेच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. FCCचे आयुक्त ब्रेंडन कार यांनी Appleचे संस्थापक टिम कुक आणि Alphabetचे संस्थापक सुंदर पिचाई यांच्यासोबत ट्विटरद्वारे एक पत्र शेअर केले होते. या पत्रामध्ये टिकटॉक अॅप स्टोअरच्या धोरणांचे उलंघन करत असल्याचा स्पष्ट उल्लेख होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()