नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत बदलला आहे. तसेच जगात एक विशिष्ट स्थान पटकावणार आहे. २०१३ मध्ये होता त्यापेक्षा आजचा भारत खूपच बदलला आहे, असं भाष्य अमिरिकन ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टेनली रिसर्चच्या एका अहवालात केलं आहे. (different India today than it was in 2013 shower of praise from Morgan Stanley report)
अहवालात म्हटलं की, भारताविषयी संशय निर्माण करणं विशेषतः परदेशी गुंतवणुकदारांबाबत २०१४ नंतर मोठे बदल झालेले बदल दुर्लक्ष करण्यासारखे आहेत. भारत जगातील दुसरी सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. गेल्या २५ वर्षात सध्या सर्वाधिक चांगली प्रगती करणारा शेअर बाजार असतानाही भारत आपल्या क्षमतेनुसार निकाल देत नसल्याचा आरोपही या अहवालातून खोडून काढण्यात आला आहे. (Latest Marathi News)
भारत एक दशकाहून कमी काळात बदलला आहे. हा भारत सन २०१३ पेक्षा वेगळा असून १० वर्षांच्या छोट्याशा काळात भारतानं जगाच्या अर्थव्यवस्थेत स्थान बळकट केलं आहे, असंही यामध्ये म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
मॉर्गन स्टेनलीच्या रिपोर्टनुसार भारतात कुठले मोठे बदल झालेत?
१) भारतानं कॉर्पोरेट टॅक्सचा दर इतर देशांसारखा केला आहे.
२) याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढत आहे.
३) याचबरोबर वस्तू आणि सेवा कराचा संग्रह देखील वाढत आहे.
४) जीडीपीच्या प्रमाणात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे.
५) डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होणं म्हणजे अर्थव्यवस्था संघटित होण्याचे संकेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.