Hajj Pilgrims: भीषण उष्णता बनली प्राणघातक! 550 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू, अनेकांवर उपचार सुरु

More Than 550 Hajj Pilgrims Die In Mecca In Blazing Heat Nearing 52 Degrees: मृत हज यात्रेकरूंमध्ये सर्वाधिक 323 इजिप्तमधील यात्रेकरूंचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी एएफपीला सांगितले. मृत हज यात्रेकरूंमध्ये अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे.
 550 pilgrims died during hajj
550 pilgrims died during hajj esakal
Updated on

Hajj Pilgrims:

वाढत्या तापमानामुळे जगभरात अनेक समस्या निर्माण होत आहेत. भारतात उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 65 च्या वर गेली होती. आखाती देश सौदी अरेबियाची अवस्था तर आणखीनच बिकट, आधीच सौदी अरेबियातील उष्मा प्राणघातक आहे. मात्र यावेळी सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने 50 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान अति उष्णतेमुळे सुमारे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे आज मंगळवारी सौदी सरकारने सांगितले आहे.

मृत हज यात्रेकरूंमध्ये सर्वाधिक 323 इजिप्तमधील यात्रेकरूंचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी एएफपीला सांगितले. मृत हज यात्रेकरूंमध्ये अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. जॉर्डनमधील सुमारे 60 हज यात्रेकरूंचा देखील मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी, हज दरम्यान, सुमारे 240 यात्रेकरू उष्णतेमुळे मरण पावले, बहुतेक इंडोनेशियन होते. सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेमुळे आजारी पडलेल्या सुमारे दोन हजार हज यात्रेकरूंवर उपचार सुरू आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.