चीन-अमेरिकेत थेट वाद-प्रतिवाद

China-America
China-America
Updated on

वॉशिंग्टन - कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर आणि अमेरिकेत नवे सरकार आल्यानंतर अमेरिका आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आज झालेल्या पहिल्याच थेट भेटीत अमेरिकेने चीनला कडक शब्दांत सुनावले. तुमच्याच आक्रमक कृत्यांमुळे जागतिक स्थैर्याला धोका निर्माण झाला असल्याचे अमेरिकेने सांगताच चीननेही तातडीने प्रत्युत्तर दिले. या घटनेमुळे आगामी काळातही या दोन देशांमधील तणाव कायम राहण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

अलास्का येथील अँकरेज याठिकाणी ही बैठक झाली. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या परराष्ट्र विभागाचे संचालक यांग जेईची आणि परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याबरोबरच अमेरिकचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन हे या बैठकीत सहभागी झाले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन देशांमध्ये सध्या असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. ‘जगात नियमांवर आधारित व्यवस्था असावी, यासाठी अमेरिका आग्रही आहे. या व्यवस्थेमुळे देशांना आपापसांतील वाद किंवा मतभेद शांततेच्या मार्गाने सोडविण्याची संधी मिळते आणि जागतिक व्यापारात समान संधी उपलब्ध होते. चीनमुळे या व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे,’ असे ब्लिंकन यांनी सांगितले. हे सांगताना ब्लिंकन यांनी हाँगकाँग, तैवान येथील राजकीय हस्तक्षेप, सायबर हल्ले, शिनजिआंगमधील अल्पसंख्यांकावरील अत्याचार अशी उदाहरणे दिली. 

चीननेही ब्लिंकन या ‘नियमाधिरित व्यवस्थे’च्या मुद्द्याचा प्रतिवाद केला. आम्ही संयुक्त राष्ट्रांनी घालून दिलेल्या आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करतो, केवळ काही निवडक देशांनी ठरविलेल्या व्यवस्थेचे पालन करण्यास चीन बांधिल नाही, असे यांग जेईची यांनी सुनावले. अमेरिकेत, अमेरिकी लोकशाही असून चीनमध्ये चिनी लोकशाही आहे. जगातील लोकांनी या लोकशाहींचे मूल्यमापन करणे आवश्‍यक आहे, असेही ते म्हणाले. जेईची हे चीनचे अमेरिकेतील माजी राजदूत आहेत. चीनच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपावर चीनने आक्षेप नोंदविला.

चीन-बरोबरील आमचे संबध असावे तिथे स्पर्धात्मक, शक्य तिथे सहकायाचे आणि गरज तिथे विरोधाचे असतील.
- अँटनी ब्लिंकन, परराष्ट्र मंत्री, अमेरिका 

अमेरिकेने स्वत:ची प्रतिमा बदलावी. स्वत:ला पटेल तीच लोकशाही यंत्रणा इतर जगावर लादू नये.
- यांग जेईची, नेते, चिनी कम्युनिस्ट पार्टी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.