जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती असा अनधिकृत विक्रम नावावर असलेल्या इराणी येथील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .इराणी मीडियाच्या वृत्तानुसार, मंगळवारी 94 वर्ष वय असलेल्या या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याने गेल्या पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून अंघोळ केली नव्हती म्हणूनच त्याला "जगातील सर्वात घाणेरडा माणूस" म्हटले जाते.‘जगातील सर्वात घाणेरडा माणूस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे नाव अमौ हाजी (Amou Haji) असल्याचे सांगण्यात येत आहे.
रिपोर्टनुसार, अमौ हाजीला आपण अंघोळ केली तर आपल्याला संसर्ग होईल अशी भीती वाटत होती, म्हणून त्याने आंघोळ करणे सोडले. अमाऊ हाजी दक्षिणेकडील फार्स प्रांतातील देजगाह गावात एकटाच राहत होता. IRNA च्या रिपोर्टनुसार, त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला. 2013 मध्ये या व्यक्तीवर 'द स्ट्रेंज लाइफ ऑफ अमाऊ हाजी' नावाची डॉक्युमेंट्री देखील बनवण्यात आली होती. अमाऊ हाजी आपले जीवन कसे जगतात हे यामध्ये दाखवण्यात आले होते.
अंघोळ न करण्यामागं काय कारण होतं?
IRNA एजन्सीने एका स्थानिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की हाजीने आजारी पडण्याच्या भीतीने आंघोळ करणे सोडले होते. पण काही महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच गावकऱ्यांनी त्याला आंघोळीसाठी बाथरूममध्ये घेऊन गेले होते. गावकऱ्यांनी सांगितले की, ते त्याच्या तरुणपणात बसलेल्या कसल्यातरी धक्क्यांमधून सावरू शकले नाहीत. ज्यामुळे त्यांनी आंघोळ करण्यास नकार दिला. 2014 मध्ये, तेहरान टाइम्सने वृत्त दिले होते की हाजी रस्त्याच्या कडेला मरून पडलेले जनावरे खातो आणि जनावरांच्या विष्ठेने भरलेल्या पाईपमधून धुम्रपान करतो. त्याचा पक्का समज होता की तो स्वच्छतेमुळे आजारी पडेल.
हाजीच्या मृत्यूनंतर, हे अनौपचारिक रेकॉर्ड आता एका भारतीय व्यक्तीकडे जाऊ शकतो. ज्याने त्याच्या आयुष्यात कधीच आंघोळ केलेली नाही. 2009 मध्ये हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले होते की, वाराणसी शहराबाहेरील एका गावातील कैलाश "कलाऊ" सिंह यांनी देशासमोरील सर्व समस्या संपवण्याच्या प्रयत्नात 30 वर्षांहून अधिक काळ अंघोळ केलेली नाही. आता हे रेकॉर्ड त्यांच्याकडे जाऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.