लस घेतलेल्यांना पिझ्झा खरेदीत सवलत; ब्रिटनमध्ये भन्नाट योजना

 corona vaccination
corona vaccinationEsakal
Updated on

लंडन : ब्रिटनमध्ये लसीकरणाचा वेग चांगला असतानाही तो अधिक वाढावा यासाठी येथील सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून युवकांनी लवकरात लवकर लस घ्यावी यासाठी त्यांना शॉपिंग व्हाऊचर, स्वस्तात पिझ्झा, टॅक्सी भाड्यात सवलत आणि इतर अनेक सवलती देण्याचा सरकारचा विचार आहे.

 corona vaccination
चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप; वुहानपेक्षा नानजिंगमध्ये वाईट स्थिती

ब्रिटनमध्ये आतापर्यंत ८८.५० टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला असून ७२.१ टक्के जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या १८ ते २९ या वयोगटातील युवकांच्या लसीकरणावर सरकारचा भर असून या गटातीलही ६७ टक्के जणांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. उरलेल्या नागरिकांचेही लसीकरण वेगाने करण्यासाठी सरकार विविध योजना राबविण्याचा विचार करत आहे. यानुसार, लस घेणाऱ्यांना प्रवासी वाहतूक सेवा देणारे ॲप आणि फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून सवलत जाहीर केली जाणार आहे. लसीकरण केंद्रापर्यंत मोफत प्रवास, लसीकरण घेतलेल्यांना पिझ्झा आणि इतर अन्नपदार्थांवर सवलत अशा स्वरूपात ही सवलत असेल. उबर, बोल्ट, डिलिव्हरू आणि पिझ्झा पिलग्रीम्स या कंपन्या सरकारी योजनेत सहभागी होणार असून आणखी काही कंपन्यांशी बोलणी सुरु आहे. लोकांचे लसीकरण पूर्ण करून जनजीवन वेगाने सुरळीत करण्यासाठीचा हा चांगला मार्ग असल्याची प्रतिक्रिया ‘डिलिव्हरू’च्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

 corona vaccination
BREAKING : कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला

लसीकरणामुळे बचाव

ही योजना राबविण्याबाबतच्या आराखड्याला अद्याप अंतिम स्वरूप आलेले नाही. मात्र, लसीकरण केंद्रावर घेतलेल्या सेल्फीचा पुरावा दाखवून नागरीकांना सवलतींचा लाभ घेता येऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, लसीकरण मोहिमेमुळे २३ जुलैपर्यंत देशात सुमारे ६० हजार जणांचा मृत्यू टाळता आला असून सव्वा दोन कोटी लोकांचा संभाव्य संसर्गापासून बचाव झाला आहे. सध्या रुग्णालयात भरती होणाऱ्यांमध्ये लस न घेतलेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचेही सरकारने सांगितले आहे.

लस घेणे हे पिझ्झा घेण्याइतकेच सोपे आहे. यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना निश्‍चितच मदत करू.

- थॉम इलियट, ‘पिझ्झा पिलग्रीम्स’चे संस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.