Narendra Modi : मोदींच्या रशिया दौऱ्याबद्दल अमेरिकी काँग्रेसमध्ये नाराजी

एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे नाटो देशांच्या बैठकीचे आयोजन करत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया दौऱ्यासाठी निवडलेली वेळ आणि त्यातून देण्यात आलेल्या संदेशामुळे अमेरिकेच्यावतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
Narendra Modi
Narendra Modi sakal
Updated on

वॉशिंग्टन) : एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे नाटो देशांच्या बैठकीचे आयोजन करत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया दौऱ्यासाठी निवडलेली वेळ आणि त्यातून देण्यात आलेल्या संदेशामुळे अमेरिकेच्यावतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकी काँग्रेसमध्ये, भारत व रशियातील वाढत्या संबंधांबद्दलही खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘‘आम्ही भारताशी याबाबत चर्चा करत आहोत,’’ अशी माहिती अमेरिकेचे दक्षिण व मध्य आशियासाठीचे साहाय्यक परराष्ट्रमंत्री डोनाल्ड लू यांनी अमेरिकेच्या खासदारांना मंगळवारी दिली.

पंतप्रधान मोदींनी जी-७ देशांच्या परिषदेदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली होती तसेच, रशिया भेटीत मोदी यांनी सर्व माध्यमांसमक्ष ‘युद्ध हा पर्याय नसल्याचे व युद्धात बळी गेलेल्या मुलांबद्दल दुःख झाल्याचे’ पुतीन यांना सांगितले, याची आठवण लू यांनी अमेरिकी काँग्रेसला करून दिली. ज्यो विल्सन यांनी मोदींच्या रशिया दौऱ्याबद्दल विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते.

मोठा करार झाला नाही

पंतप्रधान मोदी यांच्या रशियादौऱ्यावर आम्ही लक्ष ठेऊन होतो. या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियादरम्यान कोणतेही मोठे संरक्षण करार झालेले नाहीत, असे, डोनाल्ड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com